Akola News: जिल्ह्यात अवैध सावकारी करणाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्याकडून धाडी

District Collector : जिल्ह्यातील अवैध सावकारी विरोधात जिल्हाधिकाऱ्यांनी धाडसत्र सुरू केलंय. सहकार विभागाच्या बारा पथकासह या कारवाईला आज सकाळपासून सुरुवात झाली. शहरातील गौरक्षण रोड, सिंधी कॅम्प व जय हिंद चौकात सकाळ पासून ही कारवाईला सुरूवात करण्यात आलीय.
District Collector
District CollectorSaam Tv
Published On

(अक्षय गवळी)

District Collector Action Against Money Lenders :

अकोला शहर आणि जिल्ह्यातील अवैध सावकारीविरोधात जिल्हाधिकाऱ्यांनी धाडसत्र सुरू केलंय. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या निर्देशानुसार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या नेतृत्वात व पोलीस विभागाच्या सहकार्याने शहर आणि जिल्ह्यात अवैध सावकारी विरोधात धाडसत्र करत कारवाई सुरू केलीय. ही मोहीम आज सायंकाळी ५ वाजेपर्यत सुरू होती. (Latest News)

विशेष बाब म्हणजे सहकार विभागाच्या बारा पथकासह या कारवाईला आज सकाळपासून सुरुवात झाली. शहरातील गौरक्षण रोड, सिंधी कॅम्प व जय हिंद चौकात सकाळ पासून ही कारवाईला सुरूवात करण्यात आलीय. या कारवाईमुळे अवैध सावकारांची मोठी धावपळ उडाली. शहरासह इतर बारा ठिकाणी एकाच वेळी संयुक्त कारवाईला सुरुवात करण्यात आलीय.

यामध्ये किती अवैध सावकारीविरुद्ध कारवाई करण्यात आली. यासंदर्भात अधिकृत माहिती मिळू शकली नसली तरी लवकरच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातर्फ माहिती देणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या कारवाईमुळे मात्र अवैध सावकारांचे धाबे दणाणले आहेत.

District Collector
Akola Crime News: रस्त्यावर आढळले दोन मृतदेह; अकोल्यातील खळबळजनक घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com