रिंगरोड गावाच्या सीमेवरुन नेण्याची पूर्ण हवेलीतल्या शेतकऱ्यांची मागणी

Ring Road
Ring Road

पुणे : पूर्व हवेली Pune Haveli मधील शिंदवणे, तरडे वळती आणि कोरेगाव मूळ या चार गावातून जाणार असलेल्या प्रस्तावित रिंगरोड शेतकऱ्यांच्या शेतातून गेला तर सोलापूरSolapur हायवे अडवण्याचा इशारा सरपंच अण्णा महाडिक यांनी दिला आहे. Pune District East Haveli Villagers demand Diversion of Ring Road

याठिकाणी आज अधिकारी जागेची मोजणी करण्यासाठी येणार होते. परंतु त्या अधिकाऱ्यांना  माहिती मिळाली की, मोजणीच्या ठिकाणी या चारही गावचे शेतकरी एकवटले आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी मोजणी साठी येणार नसल्याचे कळवले.

हे देखिल पहा

शेतकऱ्यांचे Farmers केंद्र आणि राज्य सरकारला Maharashtra Government  आमचे एक आवाहन आहे की, आम्हा शेतकऱ्यांची रिंगरोडला जमीन देताना आमच्या कुटुंबाचा आधारच तुम्ही घेऊन जात आहात. आम्हा शेतकऱ्यांचा  या रिंगरोडला कोणताही विरोध नाही परंतु हा रिंगरोड नेताना प्रत्येक गावच्या शिवेवरून हा रिंगरोड  न्यावा एवढीच आम्हा शेतकऱ्यांची मागणी आहे, अशी भूमीका शेतकऱ्यांनी मांडली आहे. 

तुम्ही जमिनी भूसंपादन केल्यानंतर तुम्ही जो मोबदला देणार आहेPune District East Haveli Villagers demand Diversion of Ring Roadत तो आम्हा शेतकऱ्यांना किती दिवस पुरणार आहे, असा सवाल महाडिक यांनी विचारला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांशी आपण समक्ष येऊन एकदा चर्चा करावी आणि प्रत्येक गावाच्या शिवेवरून हा रिंगरोड न्यावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.

हवेलीच्या पूर्व भागातील १०३ किमी लांबीच्या ८२५ हेक्टर जागेसाठी १५ दिवसात मोजणी सुरू होईल. त्यानंतर दोन महिन्यांनी प्रत्यक्ष भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली जाणार असून दिवाळीपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट रस्ते विकास महामंडळाचे उपविभागीय अभियंता संदीप पाटील यांनी ठेवले आहे. Pune District East Haveli Villagers demand Diversion of Ring Road

मात्र या पार्श्वभूमीवर आज मोजणीसाठी अधिकारी येणार म्हणून सर्व गावचे शेतकरी या ठिकाणी गोळा झाले होते. मात्र या अधिकाऱ्यांना ही माहिती समजल्यानंतर अधिकाऱ्यांनी येणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्या अधिकाऱ्यांशी फोन वरून चर्चा करून शेतकऱ्यांबद्दलची हकीकत संदीप पाटील यांना सांगितली आणि रिंगरोड शेतकऱ्यांच्या जमिनी मधून न नेता गावच्या शिवेवरून न्यावा अशी मागणी अण्णा महाडिक यांनी केली आहे.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com