उस्मानाबाद
उस्मानाबाद

ऑक्सिजन प्रकल्प उशाला, कोरड माञ घशाला अशी अवस्था उस्मानाबादच्या वाटेला

उस्मानाबाद : उस्मानाबाद Osmanabad जिल्हा नियोजन समितीने ऑक्सिजन बेड Oxygen Bed ग्रामीण जनतेला मिळावे यासाठी एक कोटी रुपयांची तरतुद केली आहे. जिल्हयात एकुण 42 प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) असून या आरोग्य केंद्रांना प्रत्येकी 10 ऑक्सिजन बेड देण्याची व्यवस्था केली आहे. Oxygen Project In Osmanabad District But Citizens Do not Get Oxygen Beds

मात्र सध्याच्या कोरोनाच्या Corona परिस्थितीत देखील अद्यापही ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याचे चित्र जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे. एक कोटी रुपयांच्या आसपास निधी तरतूद करून देखील ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसेल तर होणार कधी? हा प्रश्न अनुत्तरित आहे. 

हे देखील पहा -

दरम्यान,जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेने हे एक कोटीचे बजेट अत्यल्प व तुटपुंजे आहे. प्रत्यक्षात पाहायचे झाले तर जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक Primary आरोग्य Health केंद्रांची Center अवस्था दयनीय झाली आहे. Oxygen Project In Osmanabad District But Citizens Do not Get Oxygen Beds

प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा तुटवडा, डॉक्टरांची कमतरता, अपुरी अत्यावश्यक साधने इत्यादी गोष्टींचा सामना या आरोग्य केंद्रांना आणि सोबतच जनतेला करावा लागत आहे. सद्यपरिस्थितीत आरोग्य व्यवस्थेवर इतका प्रचंड ताण असताना देखील हि यंञणा व्यवस्थीत चालवण्यासाठी तज्ञ मंडळींची वानवा आहे असा आरोप जिल्हा प्रशासनावर स्टुडंट हेल्पिंग हँडस् संस्थेचे कुलदीप आंबेकर यांनी केला आहे. 
 
आंबेकरांच्या म्हणण्यानुसार, भुम तालुक्यातील आंबी या त्यांच्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या एकही ऑक्सीजन बेड नाही. व्हेंटिलेटर Ventilator तर दुरचीच गोष्ट आहे. इथे प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी आणि तज्ञ देखील नाहीत. कोरोना चाचणी होते पण रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यास रुग्णाला उपचारासाठी गावातून दूर शहराच्या अथवा इतर ठिकाणी पाठवावे लागत आहे. यात रुग्णांची प्रचंड हेळसांड होत आहे. Oxygen Project In Osmanabad District But Citizens Do not Get Oxygen Beds

मूलभूत आणि जीवनावश्यक सुविधांची इतक्या मोठ्या प्रमाणावर वानवा असणे ही दुर्दैवी बाब आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची देशभर चर्चा होत असताना आमच्याकडे माञ मूलभुत आरोग्य सुविधांसाठी अजुनही मारामारच आहे. ग्रामीण भागात असणाऱ्या  आरोग्य केंद्राचा उपयोग सर्वसामान्य रुग्णांना होत नसून रुग्णांच्या जीवाची परवड होत आहे असे देखील आंबेकर म्हणाले. 

एका प्राथमिक केंद्राअंतर्गत साधारणतः 10-12 खेडी येतात. म्हणजेच साधारण 10 ते 15 हजार लोकसंख्या या आरोग्य केंद्रावर अवलंबुन आहे. लोक तपासणीसाठी याठिकाणी येत असतात. Oxygen Project In Osmanabad District But Citizens Do not Get Oxygen Beds

पण वेळप्रसंगी गरज भासल्यास येथे अँम्बुलन्स उपलब्ध होत नसल्याने खाजगी वाहनाने रुग्णांना Patient उपचारासाठी हलवावे लागत आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हाप्रशासनाने ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक झाले आहे.  
 

Edited By : Krushnarav Sathe 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com