Vivo T3 5G : भारतात लॉन्च; कॅमेरा क्लॉलिटी बॅटरी क्षमता पाहून तुम्हीही व्हाल आवाक

Vivo T3 5G : विवो टी 3 5जी स्मार्टफोन भारतात लॉन्च झालाय. या स्मार्टफोनचे अनेक फिचर्स सर्वांना वेड लावणारे आहेत. आज आपण या मोबाईलचे फिचर्स जाणून घेणार आहोत.
Vivo T3 5G
Vivo T3 5GSaam Tv

Vivo T3 5G Launched:

विवो कंपनीने भारतीय बाजारपेठेत T-Seriesसह नवीन फोन लॉन्च केलाय. विवो टी3 5जी हा फोन टी2 5जीच्या अपग्रेड व्हेरियंट आहे. नवीन Vivo T3 5G मध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आलीय. मीडियाटेक डाइमेंसिटी 7200 चिपसेट आणि 256GBचा स्टोरेज या फोनमध्ये असणार आहे. यासह AMOLED डिस्प्ले आणि डुअल रिअर कॅमेरा देण्यात आलाय. (Latest News)

Vivo T3 5G स्मार्टफोनच्या 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे, तर 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे. फोनची विक्री देशात 27 मार्चपासून विवो इंडियाच्या ऑनलाइन स्टोअर आणि फ्लिपकार्टवर दुपारी 12 वाजता सुरू होईल. Vivo T3 5G स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच फुलएचडी + (2,400 x 1,080 पिक्सेल) AMOLED डिस्प्ले मिळेल. स्क्रीनचा रिफ्रेश रेट 120 Hz आहे आणि पीक ब्राइटनेस 120 nits आहे.

फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेंशन 7200 प्रोसेसर आहे. हँडसेटमध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इनबिल्ट स्टोरेजचा पर्याय आहे. हा स्मार्टफोन Android 14 आधारित FuntouchOS 14 सह येणार आहे. या Vivo फोनला पॉवर करण्यासाठी, 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 44W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी डिव्हाइसमध्ये 5G, 4G VoLTE, Wi-Fi 6, ब्लूटूथ 5.3, GPS आणि USB Type-C सारखे फिचर्स देण्यात आली आहेत. हँडसेटला डस्ट आणि स्प्लॅश रेझिस्टंटसाठी IP54 रेटिंग देण्यात आली आहे. सुरक्षिततेसाठी, डिव्हाइसमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

Vivo T3 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आलाय. हँडसेटमध्ये 50-मेगापिक्सेलचा Sony IMX882 प्राथमिक सेन्सर आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) ला सपोर्ट करतो. तसेच या फोनमध्ये 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देखील आहे. फ्रंट कॅमेरासाठी, डिस्प्लेच्या मध्यभागी एक होल-पंच कटआउट आहे ज्यामध्ये 16-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. Vivo T3 5G च्या कॉस्मिक ब्लू कलर व्हेरियंटची डायमेंशन 163.17mm x 75.81mm x 7.83mm आहे. फोनचे वजन 185.5 ग्रॅम आहे. तर क्रिस्टल फ्लेक प्रकार 7.95 मिमी जाडी आणि 188 ग्रॅम वजनासह येतो.

Vivo T3 5G
Google Pixel 8: ऐकलं का! गुगल आणतोय स्वस्तातला मस्त फोन, जाणून घ्या फीचर्स

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com