UPI Now Pay Later: आता स्कॅन करा अन् नंतर पेमेंट करा; UPI चं नवीन फीचर, कसं काम करतं?

UPI Now Pay Later Feature: यूपीआयचं नवीन फीचर लाँच झालं आहे. UPI Now Pay Later असं या फीचरचं नाव आहे. यामध्ये तुम्ही क्रेडिट कार्डद्वारेदेखील पेमेंट करु शकतात.
UPI New Feature VPA
UPI RulesSaam tv
Published On
Summary

यूपीआयचं UPI Now Pay Later फीचर

खात्यात पुरेसे पैसे नसले तरी टेन्शन नाही

क्रेडिट लिमिटमधून होणार पैसे

सध्या सर्वकाही डिजिटल झालं आहे.पेमेंट करणेदेखील आता ऑनलाइन होतं. भाजी घेण्यापासून ते काहीही घेण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी ऑनलाइन पेमेंट करतात. काही क्लिकवर तुम्ही पेमेंट करु शकतात. दरम्यान, आता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने यूपीआयसाठी नवीन फीचर लाँच केलं आहे. UPI Now Pay Later असं या फीचरचं नाव आहे.

UPI New Feature VPA
LIC Scheme: LIC ची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् महिन्याला १०,८८० रुपयांची पेन्शन मिळवा

यूपीआयचं हे नवीन फीचर खूप उपयोगी आहे. या फीचरला यूपीआयद्वारे प्री अप्रुव्हड क्रेडिट लाइन असंही म्हणतात. यामुळे आता तुमच्या खात्यात जर पैसे नसतील तर गरज पडल्यास बँकेकडून मंजूर केलेल्या क्रेडिट कार्डचा वापर करुन पेमेंट करु शकतात. त्यामुळे जर खात्यात पैसे नसतील तरी काही टेन्शन नाही.

UPI Now Pay Later फीचर आहे तरी काय?

UPI Now Pay Later ही एक क्रेडिट सुविधा आहे. यामध्ये बँक ग्राहकांना प्री अप्रुव्हड क्रेडिट लिमिट देतात. याचा वापर करुन तुम्ही यूपीआयद्वारे पेमेंट करु शकतात. यानंतर काही ठरावीक काळात ही रक्कम परतदेखील करु शकतात. ही सुविधा शॉर्ट टर्म क्रेडिटसारखं काम करते. जर तुमच्या खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नसेल तर उपयोगी ठरते.

UPI New Feature VPA
आता बँक अकाउंटशिवाय करता येणार UPI पेमेंट; BHIM अ‍ॅपने लाँच केलं नवं फीचर

तुमची बँक तुम्हाला तुमच्या प्रोफाइल किंवा क्रेडिट स्कोअरनुसार क्रेडिट कर्जाची मर्यादा ठरवते. यामध्ये पेमेंट करताना युजर्स बँक खात्याऐवजी क्रेडिट लाइनचा पर्याय निवडू शकतात. ही रक्कम तुमच्या क्रेडिट मर्यादेतून वजा केली जाते. यानंतर अटीनुसार तुम्हाला बिल भरावे लागते.

UPI New Feature VPA
EPFO कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आता पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com