UPI Payment: आता International नंबरवरुनही करता येणार UPI पेमेंट; IDFC बँकेने सुरु केली नवी सुविधा

UPI Transaction Through International Number: आता भारताबाहेर राहणाऱ्या नागरिकांना यूपीआय पेमेंटद्वारे भारतातील लोकांना पैसे पाठवणार येणार आहे. यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही.
UPI Payment
UPI PaymentSaam Tv
Published On

सर्वकाही डिजिटल झाले आहे. त्यामुळे देशातील कोट्यवधी लोक ऑनलाइन पेमेंट करतात. यूपीआयमुळे सर्व कामे सोपी झाली आहे. अगदी भाजी खरेदीपासून ते शाळेची फी भरण्यापर्यंत सर्व कॉमे यूपीआयच्या माध्यमातून होणार आहेत. आता तुम्ही यूपीआयद्वारे इंटरनॅशनल नंबरवर पेमेंट करता येणार आहे.

UPI Payment
EPFO: आनंदाची बातमी! पीएफ खात्यातून ५ लाखांची अ‍ॅडव्हान्स रक्कम काढता येणार

इंटरनॅशनल यूपीआय पेमेंट (International UPI Payment)

अनेकांचे नातेवाईक हे परदेशात राहतात. त्यामुळे त्यांना जर भारतातील लोकांना पैसे पाठवायचे असतील तर आता ते यूपीआयच्या माध्यमातून पाठवू शकणार आहेत. IDFC First Bank ने ही नवीन सुविधा सुरु केली आहे. यामुळे आता परदेशात राहणारे ग्राहक आंतरराष्ट्रीय मोबाईल नंबरवरुन यूपीआय पेमेंट करणार आहेत.

कोणत्या देशातील ग्राहकांना होणार फायदा? (Which Country NRI Use UPI Payment)

IDFC First Bank ने लाखो एनआरआय (NRI) ग्राहकांसाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता ते भारतातील नंबरवर ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करु शकणार आहेत. आयडीएफसी बँकेने १२ देशातील ग्राहकांसाठी ही सुविधा सुरु केली आहे. ही सर्व्हिस ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, कॅनडा, हाँगकाँग, मलेशिया, ओमान, कतार, सौदी अरेबिया, सिंगापूर, यूएई, युके आणि USA मध्ये राहणाऱ्या लोकांसाठी सुरु केली आहे. या देशात राहणारे IDFC First बँकेचे NRE किंवा NRO अकाउंट होल्डर्स परदेशातील नंबरवरुन गुगल पे, फोन पे, पेटीएम या यूपीआयचा वापर करुन पैसे पाठवू शकणार आहेत.

UPI Payment
UPI व्यवहार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, आता ३ हजारांपेक्षा अधिकच्या व्यवहारांवर शुल्क?

काय सुविधा मिळणार? (Benefits Of International UPI Payment)

भारतीय सिम कार्डची गरज नाही

आता तुम्हाला पैसे पाठवण्यासाठी भारतीय नंबरची गरज नाही. आंतरराष्ट्रीय नंबरवर यूपीआय अकाउंटलिंक केले जाईल.

लवकर होईल पेमेंट

पैसे पाठवणे किंवा बिल भरणे ही सर्व कामे जलद होणार आहे.

कोणताही एक्स्ट्रा चार्ज नाही

या ट्रान्झॅक्शनसाठी कोणतीही ट्रान्झॅक्शन फी लागणार नाहीये.

सुरक्षा

तुमचे हे पेमेंट अगदी सिक्युअर असणार आहे.

फक्त रुपयांमध्येच ट्रान्झॅक्शन

ही सुविधा फक्त भारतीय रुपयांसाठी आहे. तुम्ही फक्त भारतीय रुपयांत ट्रान्झॅक्शन करु शकतात.

UPI Payment
UPI Rule Change: UPI च्या नियमांत मोठा बदल; आता फक्त १० सेकंदात करता येणार पेमेंट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com