शेअर बाजारातील पडझड तिसऱ्या दिवशीही कायम आहे. शेअर बाजारातील सेन्सेक्स 314 अंकांनी घसरला आहे. तर निफ्टी 21450 अंकांनी कोसळला आहे. या घसरणीमुळे शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे सुमारे 64 हजार कोटी रुपये बुडाले आहेत.
आजच्या व्यवहारात बँकिंग शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली. त्याचवेळी फार्मा शेअर्समध्ये तेजीचा ट्रेंड दिसून आला. व्यवहाराच्या शेवटी, BSE सेन्सेक्स 313.90 अंकांनी किंवा 0.44% घसरून 71,186.86 वर बंद झाला. तर NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 109.70 अंकांनी किंवा 0.51% टक्क्यांनी घसरून 21,462.25 वर बंद झाला.
BSE वर लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 18 जानेवारी रोजी 369.71 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले. जे मंगळवारी 17 जानेवारी रोजी 370.35 लाख कोटी रुपये होते. अशारीतीने बीएसईमध्ये लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 64 हजार कोटी रुपयांनी कमी झाले आहे. (Latest News)
यूएस फेडरल रिझर्व्हचे गव्हर्नर, क्रिस्टोफर वॉलर यांनी अलीकडेच व्याजदर कपातीला अपेक्षेपेक्षा जास्त विलंब होऊ शकतो असं म्हटलं. वॉलर यांच्या वक्तव्यामुळे जागतिक पातळीवरील गुंतवणूकदारांवर त्याचा परिणाम दिसून आला. गुंतवणूकदारांना आता शंका आहे की फेडरल रिझर्व्ह कदाचित मार्चमध्ये होणाऱ्या बैठकीदरम्यान दर कमी करणार नाही. ही कपात आता जूनमध्ये होण्याची शक्यता आहे.
जागतिक पातळीवरही बहुतांश शेअर बाजारात मंदीचे सावट आहे. 17 जानेवारी रोजी अमेरिकेचे तीनही बेंचमार्क निर्देशांक घसरणीसह बंद झाले. ऑस्ट्रेलियाचा शेअर बाजारही सलग पाचव्या दिवशी लाल रंगात बंद होताना दिसत आहे. जपान आणि दक्षिण कोरियाच्या बाजारातही सपाट व्यवहार होता. निफ्टीने त्याची 21,550 ची महत्त्वाची सपोर्ट लेव्हल मोडली आहे, जी त्याची 21 दिवसांची Moving Average होती. त्यामुळे विक्रीचा दबाव आणखी वाढला आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
बीएसई सेन्सेक्समधील 30 पैकी 11 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्ये सन फार्माच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 2.86% वाढ झाली. यानंतर, टेक महिंद्रा, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) आणि अॅक्सिस बँक यांचे शेअर्स सर्वाधिक वाढले.
सेन्सेक्सचे उर्वरित 19 शेअर घसरणीसह बंद झाले. यामध्येही एनटीपीसीचे शेअर ३.१२ टक्क्यांच्या घसरणीसह सर्वाधिक घसरले. तर HDFC बँक, पॉवर ग्रिड, टायटन आणि एशियन पेंट्सचे शेअर घसरले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.