तीन वेळा होणार फोल्ड, 50MP कॅमेरा; 5,600mAh बॅटरी; Samsung चा जबरदस्त स्मार्टफोन येतोय; किती असेल किंमत?

Samsung Tri-Fold Phone : Samsung लवकरच बाजारात आपला पहिला Tri Fold स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...
तीन वेळा होणार फोल्ड, 50MP कॅमेरा; 5,600mAh बॅटरी; Samsung चा जबरदस्त स्मार्टफोन येतोय; किती असेल किंमत?
Samsung Tri-Fold PhoneSaam Tv
Published On

सध्या बाजारात फोल्डेबल फोनच्या मागणीत वाढ होताना दिसत आहे. प्रसिद्ध मोबाइल उत्पादक कंपनी सॅमसंगचे बाजारात अनेक फोल्डेबल हँडसेट उपलब्ध आहे. मात्र आता कंपनी मोठा धमाका करणार आहे. कंपनी पहिल्यांदाच बाजारात असा फोन लॉन्च करणार आहे. जो तीनवेळा फोल्ड होणार. या फोनसह कंपनी Tri-fold सेगमेंटमध्ये पाऊल ठेवणार आहे. याआधी Huawei ने जगातील पहिला Tri-fold फोन लॉन्च केला होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सॅमसंग आता Tri-fold मार्केटमध्ये स्पर्धा करण्याची तयारी करत आहे. याचा कंपनीला अधिक फायदा होईल, कारण Huawei चे फोन अद्याप अनेक बाजारपेठेत उपस्थित नाहीत. सॅमसंगने Tri-fold वर काम सुरू केले आहे, ज्यामध्ये स्क्रीन दोनदा फोल्ड केली जाऊ शकते आणि ती Huawei Mate XT सारखी असेल.

तीन वेळा होणार फोल्ड, 50MP कॅमेरा; 5,600mAh बॅटरी; Samsung चा जबरदस्त स्मार्टफोन येतोय; किती असेल किंमत?
ऐका हो ऐका! लवकरच लॉन्च होणार OnePlus 13R, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

सॅमसंग पुढील वर्षी Tri Fold फोन लॉन्च करू शकतं. Tri Fol स्क्रीनच्या डेव्हपलमेंटचे काम सॅमसंगच्या डिस्प्ले विंगने केले आहे. मात्र याच्या लॉन्चिंगबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तसेच याचा किंमत बदलली अद्याप माहिती समोर आल नाही.

Huawei Mate XT

Huawei Mate XT हा सध्या एकमेव फोन आहे, जो Tri Fold सह येतो. मात्र हा फोन चीनबाहेर उपलब्ध नाही. Huawei वर यूएस मार्केटमध्ये बंदी घातल्यापासून ते आंतरराष्ट्रीय बाजारात काही फ्लॅगशिप हँडसेट लॉन्च करत आहेत. सॅमसंगने पुढच्या वर्षी आपला Tri Fold फोन लॉन्च केल्यास, जागतिक बाजारात हा फोन लॉन्च करणारी ती पहिली कंपनी ठरेल.

तीन वेळा होणार फोल्ड, 50MP कॅमेरा; 5,600mAh बॅटरी; Samsung चा जबरदस्त स्मार्टफोन येतोय; किती असेल किंमत?
Realme P1 Speed ​​5G चा आजपासून सेल; कमी बजेटमध्ये फोन घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी

Huawei Mate XT मध्ये 6.4-इंचाचा OLED डिस्प्ले आहे. अनफोल्ड केल्यानंतर या फोनमध्ये 10.2 इंचाचा डिस्प्ले मिळेल. यामध्ये स्क्रीन दोनदा फोल्ड होते. Huawei Mate XT मध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. याचा सेकंडरी कॅमेरा 12-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आहे. तिसरा कॅमेरा 12-मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्स आहे, जो 5.5x ऑप्टिकल झूम ऑफर करतो. यात 5,600mAh सिलिकॉन कार्बन बॅटरी देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com