Silai Machine Yojana: गरजू महिलांसाठी महत्वाची बातमी, सरकार देत आहे मोफत शिलाई मशीन; जाणून घ्या काय आहे योजना...

Central Government Schemes: गरजू महिलांसाठी महत्वाची बातमी, सरकार देत आहे मोफत शिलाई मशीन; जाणून घ्या काय आहे योजना...
Free Silai Machine Yojana 2023
Free Silai Machine Yojana 2023Saam Tv
Published On

Free Silai Machine Yojana 2023: भारत सरकार महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांना विविध आघाड्यांवर प्रगती करण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. आजही देशात अनेक महिला आहेत, ज्यांना स्वयंरोजगार सुरू करायचा आहे. मात्र, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याने त्यांना ते जमत नाही.

अशातच आज आम्ही तुम्हाला सरकारच्या एका जबरदस्त योजनेबद्दल सांगणार आहोत. 'मोफत शिलाई मशीन योजना', असे या योजनेचे नाव आहे. शासनाच्या या योजनेत महिला नोंदणी करून मोफत शिलाई मशीनचा लाभ घेऊ शकतात. या शिलाई मशिनच्या मदतीने महिला अल्प प्रमाणात स्वत:चा स्वयंरोजगार सुरू करू शकतात. सरकारच्या या योजनेचा देशातील अनेक महिला लाभ घेत आहेत. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

Free Silai Machine Yojana 2023
National Saving Certificate Scheme: बँकेत एफडी करण्याऐवजी या सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करा, मिळेल जबरदस्त फायदा

मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. यासाठी तुम्हाला https://www.india.gov.in/ या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. (Latest Marathi News)

शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला येथून अर्ज डाउनलोड करावा लागेल. यानंतर तुम्हाला हा फॉर्म भरावा लागेल. या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची सर्व आवश्यक माहिती टाकावी लागेल.

Free Silai Machine Yojana 2023
IAS आणि IPS यांच्यात कोणाकडे असतात जास्त अधिकार आणि पगार, दोघांमध्ये काय आहे फरक? जाणून घ्या...

फॉर्म भरल्यानंतर त्यासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून ती संबंधित विभागाकडे जमा करा. फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल. जर तुम्ही अर्जात दिलेली सर्व आवश्यक माहिती बरोबर असेल. अशा परिस्थितीत तुम्हाला मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ दिला मिळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com