Petrol Diesel Price: खुशखबर! पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होणार; सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

Petrol Diesel Price To Drop: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता पेट्रोल डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवले जाणार आहे त्यामुळे हे दर कमी होऊ शकतात.
Petrol Diesel Price
Petrol Diesel PriceSaam Tv
Published On
Summary

पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होणार

कच्च्या तेलाच्या उत्पादनात वाढ होणार

भारताला होणार फायदा

रोज लाखो लोक स्वतः च्या खाजगी वाहनांनी प्रवास करतात. अनेकजण ऑफिसला जाताना किंवा कॉलेजला जाताना कार किंवा बाईक घेऊन जातात. त्यामुळे रोज पेट्रोल डिझेलचा खर्च करावा लागतो. सध्या पेट्रोल डिझेलचे दर खूप वाढले आहेत. त्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला फटका बसत आहे. परंतु आता सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे.

Petrol Diesel Price
Types Of Gold Carat : बाजारात आलंय नवं सोनं; दागिन्याची किंमत ५० टक्क्यांनी स्वस्त, जाणून घ्या माहिती

ओपेक देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दररोज तब्बल ५.४७ लाख बॅरलने हे उत्पादन वाढवले जाणार आहे. .यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाची उपलब्धता वाढणार आहे. याचाच परिणाम असा होईल की, पेट्रोल डिझेल आणि इंधनाच्या किंमती कमी होतील.

रशिया, सौदी अरेबियासह अनेक देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारताला फायदा होणार आहे. भारत हा कच्चे तेल आयात करतो. त्यातील सर्वाधित तेल हे रशियाकडून घेतले जाते. त्यामुळे जर उत्पादन वाढले तर कच्च्या तेलाच्या किंमती आपोआप कमी होतील. या एका निर्णयामुळे भारताला खूप फायदा होऊ शकतो. पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होऊ शकतात त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल.

Petrol Diesel Price
EPFO चा मोठा निर्णय; पीएफ खात्यात एकही पैसा नसला तरी EDLI मधून मिळतील ५०,०००रुपये

आजचे पेट्रोल डिझेलचे दर (Today Petrol Diesel Rate)

आज मुंबईत पेट्रोलची किंमत १०३.५० रुपये आहेत. डिझेलचे दर प्रति ९०.०३ लिटर

पुण्यात पेट्रोलचे दर १०४.१० रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलचे दर ९०.७१ रुपये आहेत.

ठाण्यात पेट्रोलचे दर १०३.६४ रुपये आहे तर डिझेल ९०.१६ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे.

साताऱ्यात १ लिटर पेट्रोलची किंमत १०४.७० रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.२१ रुपये आहे.

Petrol Diesel Price
Petrol Price: पेट्रोल डिझेलवर टॅक्स नसेल तर १ लिटरची किंमत किती? वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com