Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; सामान्यांना मोठा दिलासा

Petrol Diesel Price (18 May 2024) : घरातून बाहेर पडण्याआधी इंधनाचे दर जाणून घेणे महत्वाचे आहे. आज शनिवारी कच्च्या तेलाच्या नव्या किंमती जाहीर झाल्या आहेत. सकाळी सहा वाजताच या किंमती जाहीर झाल्यात
Petrol Diesel Price (18 May 2024)
Petrol Diesel Price Saam TV

देशभरासह राज्यात इलेक्ट्रीक कार आणि बाईक्स दाखल झाल्या आहेत. पेट्रोल-डिझेलचे वाढते दर पाहून अनेक व्यक्ती आात इलेक्ट्रीक वाहनांनी प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. येणाऱ्या काळात पेट्रोल-डिझेलचा साठा कमी होऊन इंधनाचे दर आणखी वाढू शकतात त्यावर पर्याय म्हणून इलेक्ट्रीक वाहने वापरण्यास प्राधान्य दिलं जात आहे.

Petrol Diesel Price (18 May 2024)
Smart Businesses Ideas: घरबसल्या होईल बम्पर कमाई; कमी बजेटमध्ये करता येणारे व्यवसाय

असे असले तरी काही ठिकाणी अद्यापही इलेक्ट्रीक व्हेइकल जास्तप्रमाणात नाहीत. अनेक व्यक्तींकडे पेट्रोल आणि डिझेलवर चालणारीच वाहने आहेत. त्यामुळे घरातून बाहेर पडण्याआधी इंधनाचे दर जाणून घेणे महत्वाचे आहे. आज शनिवारी कच्च्या तेलाच्या नव्या किंमती जाहीर झाल्या आहेत. सकाळी सहा वाजताच या किंमती जाहीर झाल्यात. त्यामुळे आजचे नवे दर जाणून घेऊ.

पेट्रोल-डिझेलचे शनिवारचे नवे दर

शनिवारी पेट्रोल-डिझेलच्या दरांत फार बदल झालेला नाही. कच्च्या तेलाच्या किंमती आजही कालच्या किंमतीं एवढ्याच आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेल वापरणाऱ्या नागरिकांसाठी दिलासदायक गोष्ट म्हणजे आजही दर वाढलेले नाहीत. राज्यात सध्या निवडणुकीच्या रणधुमाळी सुरु आहे. या काळात अद्याप पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर असल्याचं दिसत आहे.

मुंबई आणि पुण्यात पेट्रोलच्या किंमती किती?

मुंबईत पेट्रोल १०४.२१ रुपये प्रति लिटर दराने विकलं जात आहे. तर पुण्यात आज पेट्रोल १०४.०८ रुपये प्रति लिटर दराने पेट्रोल आहे.

मुंबई आणि पुण्यात डिझेलच्या किंमती किती?

मुंबईत शनिवारी डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाहाी. डिझेलचे दर ९२.१५ रुपये प्रति लिटर आहेत. तर पुण्यात डिझेल ९०.६१ रुपये प्रति लिटरवर पोहचलं आहे.

महाराष्ट्रातील अन्य राज्यांमधील पेट्रोलच्या किंमती

वाशिममध्ये पेट्रोल - १०४.८७ रुपये

वर्धामध्ये पेट्रोल - १०४.४४ रुपये

सातारामध्ये पेट्रोल - १०५.१० रुपये

परभणीमध्ये पेट्रोल - १०७.३९ रुपये

कोल्हापूरमध्ये पेट्रोल - १०४.२९ रुपये

महाराष्ट्रातील अन्य राज्यांमधील डिझेलच्या किंमती

वाशिममध्ये डिझेल - ९१.४० रुपये

वर्धामध्ये डिझेल - ९०.९९ रुपये

सातारामध्ये डिझेल - ९१.५९ रुपये

परभणीमध्ये डिझेल - ९३.७९ रुपये

कोल्हापूरमध्ये डिझेल - ९०.८४ रुपये

Petrol Diesel Price (18 May 2024)
Petrol Diesel Fresh Prices : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; वाचा मुंबई पुण्यात महागलं की स्वस्त झालं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com