Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा अर्ज अजूनही भरु शकतो का? आता अर्ज भरल्यास पैसे किती मिळणार? वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana Last Date Extended : लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याची शेवटची तारीख संपली आहे. मात्र तरीही काही महिलांना सध्या अर्ज करता येऊ शकतो का याची माहिती जाणून घेऊ.
Ladki Bahin Yojana Last Date Extended
Ladki Bahin YojanaSaam TV
Published On

राज्यात सध्या लाडकी बहीण योजनेचा गाजावाजा सुरू आहे. आजवर अनेक गरजू महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. तर अद्यापही काही महिलांना योजनेचा लाभ मिळालेला नाही. तसेच काहींचे अर्ज देखील भरण्यात आले नाहीत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा अर्ज सध्या भरता येऊ शकतो का? तसेच आता अर्ज भरल्यास आपल्याला पैसे केव्हा आणि किती मिळणार? असे अनेक प्रश्न काही महिलांच्या मनात येत आहेत.

Ladki Bahin Yojana Last Date Extended
Ladki Bahin Yojana : अजितदादांचा नवा वादा, लाडक्या बहि‍णींना पुन्हा मिळणार 3000 रुपये; केव्हा अन् कधी? वाचा

महिलांच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे या बातमीमधून मिळणार आहेत. यामध्ये आम्ही तुम्हाला लाडकी बहीण योजनेची मुदत वाढ झाली आहे का? तसेच मुदत वाढल्यास त्याची अंतिम तारीख काय असेल? याने महिलांना किती प्रमाणात लाभ मिळेल याची माहिती सांगणार आहोत.

लाडकी बहीण योजनेची अंतिम तारीख

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आधी अर्ज करावा लागतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख आधी ३१ ऑगस्ट देण्यात आली होती. त्यानंतर तारीख वाढवून ती ३१ सप्टेंबर करण्यात आली. आता ही तारीख आणखी वाढवून ३१ ऑक्टोबर करण्याची शक्यता आहे.

सध्या ही तारीख वाढवलेली नाही. लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ३१ सप्टेंबर होती. यानंतर ही साईड बंद झाली आहे. त्यामुळे कोणत्याही महिलेला सध्या या योजनेचा फॉर्म भरता येणार नाही.

आता अर्ज भरल्यावर पैसे येणार का?

लाडकी बहीण योजनेतून महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून ऑगस्टमध्ये महिलांना ३,००० रुपये मिळाले होते. त्यानंतर सप्टेंबरमध्ये मुदतवाढ झाल्यावर या महिन्यात पैसे भरलेल्या महिलांना एकाच महिन्याचे पैसे देण्यात आले. तसेच आता पुढे मुदत वाढल्यावर देखील जुलै महिन्यापासून नाही तर फक्त याच महिन्याचे पैसे महिलांना मिळू शकतात.

Ladki Bahin Yojana Last Date Extended
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत फसवणूक; सीएससी केंद्र चालकाविरोधात गुन्हा दाखल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com