मेटा रे-बॅन डिस्प्ले हे हेड-अप डिस्प्ले असलेले स्मार्ट ग्लासेस सादर झाले.
रे-बॅन मेटा (जनरेशन २) मध्ये ३के अल्ट्रा एचडी व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधा देण्यात आली.
खेळाडूंसाठी ओकले मेटा व्हॅनगार्ड ग्लासेस लाँच झाले जे वर्कआउट फीडबॅक देतात.
या लाँचमुळे मेटाने पुन्हा एकदा वेअरेबल टेक्नॉलॉजीमध्ये वर्चस्व सिद्ध केले.
मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी मेटा कनेक्ट २०२५ कार्यक्रमात अनेक क्रांतिकारक उत्पादने लाँच केली आहेत. हा कार्यक्रम कॅलिफोर्नियातील मेलानो पार्क येथील मेटा मुख्यालयातून भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरुवार सकाळी सुरू झाला. या महत्त्वपूर्ण टेक इव्हेंटमध्ये सादर झालेल्या प्रमुख लाँचपैकी सर्वाधिक चर्चेत असलेले उत्पादन म्हणजे मेटा रे-बॅन डिस्प्ले.
नव्या रे-बॅन डिस्प्ले ग्लासेसमध्ये हेड-अप डिस्प्ले तंत्रज्ञानाचा समावेश आहे. ज्यामुळे यूजर्सना थेट चष्म्यावर मेसेजेस, व्हिडिओ, व्हिडिओ कॉल तसेच नकाशांवरील दिशानिर्देश पाहता येतात. हे ग्लासेस संदेश वाचणे, फोटोंचे पूर्वावलोकन करणे आणि दैनंदिन संवाद अधिक सहज बनविण्याचे काम करतात. १२-मेगापिक्सेल बिल्ट-इन कॅमेऱ्याने सज्ज असलेले हे स्मार्ट ग्लासेस यूजर्सना फोटो आणि व्हिडिओ सहजतेने कॅप्चर करण्याची सुविधा देतात. त्यांची किंमत US$७९९ (सुमारे ७०,२२९ रुपये) ठेवण्यात आली आहे.
या चष्म्यांसोबत मेटा न्यूरल बँडचा वापर अनिवार्य आहे. हे बँड इलेक्ट्रोमायोग्राफी (EMG) तंत्रज्ञानावर आधारित असून हातांच्या हालचाली ओळखून ग्लासेसवरील डिस्प्ले नियंत्रित करण्याचे काम करते. झुकरबर्ग यांनी कार्यक्रमादरम्यान आणखी एक महत्त्वाची घोषणा केली की लवकरच या मेटा रे-बॅन डिस्प्लेला एक नवीन अपडेट मिळेल, ज्यामुळे यूजर्स हवेत बोटे हलवून टायपिंग करू शकतील.
याशिवाय, कंपनीने रे-बॅन मेटा (जनरेशन २) ग्लासेसची अद्ययावत आवृत्तीही बाजारात आणली आहे. यात स्मार्ट डिस्प्ले नसला तरी ते ३के अल्ट्रा एचडी व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतात. नव्याने जोडलेले "कॉन्व्हर्सेशन फोकस" वैशिष्ट्य कॉल दरम्यान व्यक्तीच्या आवाजावर लक्ष केंद्रित करून अनावश्यक पार्श्वभूमी आवाज कमी करण्याचे काम करते. या मॉडेलची किंमत US$३७९ (अंदाजे ३३,२९५ रुपये) आहे.
खेळाडूंसाठी विशेष डिझाइन केलेले ओकले मेटा व्हॅनगार्ड हे आणखी एक मोठे आकर्षण ठरले. यात सेंटर कॅमेऱ्याच्या मदतीने वाइल्ड व्ह्यूज टिपता येतात तसेच गार्मिन डिव्हाइसच्या समन्वयाने रिअल-टाइम वर्कआउट फीडबॅक मिळतो. या स्पोर्ट्स-केंद्रित चष्म्यांची किंमत US$४९९ निश्चित करण्यात आली आहे.
मेटा कनेक्ट २०२५ मधील या घोषणांनी तंत्रज्ञान क्षेत्रात पुन्हा एकदा मेटाचे वर्चस्व दर्शवले आहे. आभासी वास्तव आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचे मिश्रण करून यूजर्सचा डिजिटल अनुभव अधिक समृद्ध व भविष्यकालीन करण्याचा मेटाचा निर्धार स्पष्टपणे दिसतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.