भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) ने एक नवीन‘प्युअर फॉर शुअर’सुविधा सुरू केलीय. या सुविधेनुसार आता बीपीसीएलचे एलपीजी सिलिंडर ज्यावेळी ग्राहकाच्या घरी पोहोचते केलं जाईल त्यावेळी ते सील प्रूफ असेलच. शिवाय त्यावर आता क्यूआर कोड देखील दिले जाणार आहे. ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सिलिंडरची गुणवत्ता आणि त्याच्या प्रमाणाची हमी देण्यासाठी ही नवी सुविधा बीपीसीएल कंपनीकडून सुरू करण्यात आलीय.(Latest News)
यातून काय होणार फायदा ?
गेली काही महिन्यापासून सिलेंडरमधील गॅस काढून त्याचा काळाबाजार करण्याचे प्रमाण वाढले होते. सिलिंडरमधील काळाबाजाराला आळा घालण्यासाठी क्यूआर कोड देण्यात येणार आहे. या कोडमध्ये सिलिंडरची सर्व माहिती असणार आहे. QR कोड स्कॅन केल्यावर ग्राहकांना सिग्नेचर ट्यूनसह एक खास प्युअर फॉर शुअर पॉप-अप दिसेल. यावर सिलिंडर संबंधित सर्व तपशील उपलब्ध होणार आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सिलेंडर भरताना त्याचे एकूण वजन किती होते? सील चिन्ह होते की नाही इत्यादी माहिती यामधून मिळणार आहे. सिलेंडरची डिलिव्हरी स्वीकारण्यापूर्वी सिलिंडर सुरक्षित आहे की नाही हे तपासण्यासाठी क्युआर कोडची फार मोठी मदत होणार आहे. सिलिंडरच्या सीलमध्ये काही छेडछाड झाली असेल तर QR कोड स्कॅन होणार नाही. ज्यामुळे पुढील वितरण थांबेल अशी माहितीही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलीय. एलपीजी इकोसिस्टममध्ये काही समस्या आहेत. ट्रांझिटमध्ये चोरी, अपेक्षित वितरण वेळेवर ग्राहक उपस्थिती नसणे, रिफिल डिलिव्हरीसाठी स्वतःची वेळ निवडणे, अशा समस्याचे निराकरण करण्यासाठी ही सुविधा आधील उपयुक्त ठरेल, असं म्हटलं जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.