WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिनसाठी लागणार लायसन्स, पैसेही मोजावे लागणार

WhatsApp New Update: व्हॉट्सअ‍ॅप नेहमीच आपल्यासाठी नवनवीन फिचर घेऊन येत असतात. एचडी क्वालिटी फोटो, व्हॉट्सअ‍ॅप व्हॉइस स्टेटस असे अनेक वेगवेगळे नवीन फिचर व्हॉट्सअ‍ॅपने आतापर्यंत आणले आहेत.
new feature
whatsappyandex
Published On

जगभरात अधिक वापरले जाणारे व्हॉट्सअ‍ॅप हे लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. व्हॉट्सअ‍ॅप नेहमीच आपल्यासाठी नवनवीन फिचर घेऊन येत असतात. एचडी क्वालिटी फोटो, व्हॉट्सअ‍ॅप व्हॉइस स्टेटस असे अनेक वेगवेगळे नवीन फिचर व्हॉट्सअ‍ॅपने आतापर्यंत आणले आहेत. तसेच भविष्यात आणखी काही नवीन फिचर आणण्याच्या प्रयत्नात आहे. कोणीही व्हॉट्सअ‍ॅपवर त्यांना पाहिजे तेव्हा ग्रुप बनवू शकतो, बोलू शकतो.

एका अहवालानुसार, झिम्बाब्वे सरकारने एक नवीन नियम जाहीर केला आहे. सर्व व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप प्रशासकांना आता पोस्ट अँड टेलिकम्युनिकेशन्स रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ झिम्बाब्वे (POTRAZ) मध्ये नोंदणी करावी लागेल आणि त्यांचा ग्रुप चालवण्यासाठी काही परवाना द्यावा लागेल. झिम्बाब्वेचे माहिती, संप्रेषण तंत्रज्ञान, पोस्टल आणि कुरिअर सेवा मंत्री (ICTPCS) ततेंडा म्वेटेरा यांनी ही घोषणा केली. परवान्याची किंमत किमान 50 डॉलर (सुमारे 4200 रुपये) आहे.

new feature
Whatsapp: व्हॉट्सअ‍ॅपचं नवं फिचर; व्हिडीओ कॉल करणं आता झालं अधिक सोपं

नवीन नियम काढण्याच्या मागे असा उद्देश आहे की, नवीन व्हॉट्सअ‍ॅप नियमन चुकीची माहिती पसरवणे आणि संभाव्य अशांतता रोखणे हा उद्देश आहे. देशाच्या डेटा संरक्षण कायद्याशी सुसंगत असणे हे देखील त्याचे उद्देश आहेत.कायद्यानुसार, जी एखाद्या व्यक्तिला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे ओळखण्यासाठी वापरली जाऊ शकते. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिन्सना ग्रुप सहस्यांचा फोन नंबरवर प्रवेश असतो, त्यामुळेच ते डीपीए अंतर्गत येतात.

Written By: Dhanshri Shintre.

new feature
WhatsApp ने बंद केले तब्बल ६९ लाख अकाउंट्स; काय आहे कारण? जाणून घ्या

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com