LIC GST Notice : एलआयसीला GST विभागाकडून ८०६ कोटींची नोटीस, शेअर्समध्ये दीड टक्क्यांहून अधिक घसरण

LIC share drop after GST Notice : जीएसटीची नोटीस मिळाल्यानंतर एलआयसीने सांगितले की, ते निर्धारित वेळेत मुंबईतील आयुक्तांसमोर अपील दाखल करणार आहेत.
LIC
LIC Saam TV

Mumbai News :

भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) आणि वाहन उत्पादक कंपनी आयशर मोटर्स यांना जीएसटी नोटिसा मिळाल्या आहेत. यामध्ये GST कमी भरल्यामुळे २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी LIC ला ८०६ कोटी रुपयांची GST नोटीस पाठवण्यात आली होती. तर जीएसटीशी संबंधित तीन वेगवेगळ्या कारणांसाठी आयशर मोटर्सला १३० कोटी रुपयांहून अधिकची नोटीस बजावण्यात आली होती.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जीएसटीची नोटीस मिळाल्यानंतर एलआयसीने सांगितले की, ते निर्धारित वेळेत मुंबईतील आयुक्तांसमोर अपील दाखल करणार आहेत. मात्र या GST नोटिसीचा कंपनीच्या आर्थिक किंवा इतर कोणत्याही कामांवर कोणताही परिणाम होणार नाही, असे एलआयसीने म्हटले आहे. (Latest Marathi News)

LIC
Business Tips In Marathi: स्वत:चा व्यवसाय सुरु करायचाय? महत्वाच्या ५ गोष्टी सर्वात आधी करा

जीएसटीच्या नोटीसनुसार, ३६५.०३ कोटी रुपयांचा जीएसटी, ४०४.७कोटी रुपयांचा दंड आणि ३६.५ कोटी रुपयांच्या व्याजाचा समावेश आहे. या नोटिशीच्या विरोधात अपील करणार असल्याचे एलआयसीने म्हटले आहे. याआधीही ऑक्टोबरमध्ये एलआयसीला ८४ कोटी रुपये आणि सप्टेंबरमध्ये २९० कोटी रुपयांच्या आयकर दंडाच्या नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या.

LIC
Recharge: नवीन वर्षाचं गिफ्ट; दमदार सूटसह रिचार्जवर मिळेल मोफत OTT चा आनंद

LIC च्या शेअर्समध्ये घसरण

एलआयसीला मिळालेल्या नोटीसचा फटका कंपनीच्या शेअर्सवर झाला आहे. आज २ जानेवारी रोजी एलआयसीचे शेअर ८५६.२० रुपयांनी खुले झाले होते. मात्र काही वेळातच दीड टक्क्यांहून अधिकची घसरण शेअर्समध्ये पाहायला मिळाली. सकाळी ११.३० वाजता शेअर १.७१ टक्क्यांच्या घसरणीसह ८४४.४० रुपयांवर ट्रेड करत होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com