LIC ची 'ही' योजना महिलांसाठी आहे जबरदस्त, फक्त 87 रुपये वाचवू मिळणार 11 लाख रुपये; कसं? ते जाणून घ्या

LIC Aadhaar Shila Plan: LIC ची 'ही' योजना महिलांसाठी आहे जबरदस्त, फक्त 87 रुपये वाचवू मिळणार 11 लाख रुपये; कसं? ते जाणून घ्या
LIC Aadhaar Shila Plan
LIC Aadhaar Shila Plan Saam TV
Published On

LIC Aadhaar Shila Plan:

एलआयसी देशातील विविध उत्पन्न गटांना लक्षात घेऊन अनेक उत्तम योजना चालवत आहे. एलआयसीच्या या योजनांमध्ये गुंतवणूक करून लोकांना खात्रीशीर परतावा मिळतो. त्यांना बाजारातील धोक्यांचा सामना करावा लागत नाही. या कारणास्तव, लोक इतर कोणत्याही योजनांमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी एलआयसी योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात.

यातच आज आम्ही तुम्हाला एलआयसीच्या एका अतिशय जबरदस्त योजनेबद्दल सांगणार आहोत, जी विशेषतः महिलांसाठी चालवली जात आहे. एलआयसीच्या या योजनेचे नाव आधार शिला योजना आहे. ही एलआयसीची नॉन-लिंक्ड वैयक्तिक जीवन विमा योजना आहे. एलआयसीच्या या योजनेत गुंतवणूक करून, तुम्ही मॅच्युरिटीच्या वेळी निश्चित परतावा मिळवू शकता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

LIC Aadhaar Shila Plan
WRD Recruitment News: महाराष्ट्र जलसंपदा विभागात नोकरीची सुवर्णसंधी, पगार 1 लाख रुपयांपेक्षा जास्त, असा करा अर्ज

तुम्हालाही एलआयसीच्या आधार शिला योजनेत 87 रुपये वाचवून 11 लाख रुपये जमा करायचे असतील, तर गुंतवणुकीचे हे गणित नीट समजून घेऊया. जर तुम्ही दररोज 87 रुपये वाचवत असाल आणि या योजनेत वार्षिक 31,755 रुपये गुंतवले, अशा परिस्थितीत तुम्ही दहा वर्षांत जमा केलेली रक्कम 3,17,550 रुपये असेल. (Latest Marathi News)

जेव्हा पॉलिसी धारकाचे वय 70 वर्षे पूर्ण होते. तेव्हा त्याला एकूण 11 लाख रुपये मिळतील. जर तुम्ही एलआयसीच्या आधारशिला योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला त्यात अनेक फायदे मिळतात.

LIC Aadhaar Shila Plan
Gold Silver Price Today (6th November): सोन्याचा भाव घसरला, चांदीची चकाकीही नरमली; वाचा आजचे दर

या योजनेत पॉलिसीधारकाचा अकाली मृत्यू झाल्यास, अशा परिस्थितीत नॉमिनीला पैसे दिले जातात. एलआयसीच्या आधारशिला योजनेत कर्जाचा लाभ देखील उपलब्ध आहे. 8 ते 55 वर्षे वयोगटातील महिला एलआयसीच्या या योजनेत गुंतवणूक करू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com