June 2024 New Rules: महिन्याच्या पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी; गॅस सिलिंडरपासून ते क्रेडिट कार्डपर्यंत ५ मोठे बदल

Rule Change From Today : बदलामुळे महिन्याच्या खर्चातील गॅस सिलेंडरपासून ते क्रेडिट कार्डपर्यंत अनेक गोष्टींवरील दर कमी झालेत. त्याबाबतच सविस्तर माहिती जाणून घेऊ.
Rule Change From Today
June 2024 New RulesSaam TV

दर महिन्याला होणाऱ्या खर्चाचं बजेट एक तारखेलाच ठरवलं जातं. तुम्ही देखील या महिन्याच्या बजेटची लिस्ट तयार केली असेल. पण तुम्हाला माहितीये का? जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी अनेक गोष्टींमध्ये बदल झाला आहे. या बदलामुळे महिन्याच्या खर्चातील गॅस सिलिंडरपासून ते क्रेडिट कार्डपर्यंत अनेक गोष्टींवरील दर कमी झालेत. त्याबाबतच सविस्तर माहिती जाणून घेऊ.

Rule Change From Today
Flight New Rule: विमान प्रवाशांसाठी खुशखबर! आता मुलांना मिळणार स्वतंत्र जागा

LPG गॅल सिलिंडरच्या किंमती

जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत सलग तिसऱ्या महिन्यात घट झाली आहे. 19 किलोची व्यावसायिक गॅस सिलिंडरची टाकी 72 रुपयांनी स्वस्त झाली आहे. 1 जूनपासून मुंबईत 69.50 रुपयांनी गॅस सिलिंडर स्वस्त झाला आहे. त्यामुळे आजपासूनची किंमत 1676 रुपये इतकी असणार आहे.

ATF च्या किंमती कमी झाल्या

तेल विपणन कंपन्यांनी हवाई इंधनाच्या म्हणजेच Air Turbine Fuel (ATF) च्या किं मती देखील कमी केल्या आहेत. IOCL दिलेल्या माहितीनुसार, हवाई इंधनाची किंमत मुंबईमध्ये 95,173.70 रुपये प्रति किलोलीट होती. ती आता 88,834.27 रुपये प्रति किलोलीट इतकी झाली आहे. दिल्लीमध्ये 94,969.01 रुपये प्रति किलोलीटर, तर कोलकात्यात 1,03,715 रुपये प्रति किलोलीटर आणि चेन्नईत 1,03,715 रुपये प्रति किलोलीटर इतकी किंमत आहे.

SBI क्रेडिट कार्ड

महिन्याच्या पहिल्याच दिवशी क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी आहे. जर तुमच्याकडे SBI बँकचे क्रेडिट कार्ड असेल तर नवीन नियम काय आहेत ते जाणून घ्या. नव्या नियमानुसार, SBI क्रेडिट कार्डमध्ये सरकारी व्यवहारांवर मिळणारे रिवॉर्ड पॉइंट आता बंद झाले आहेत.

बदललेला नियम SBI च्या पुढील कार्डसाठी लागू होतो

SBI AURUM

SBI Card ELITE

SBI Card ELITE Advantage

SBI Card Pulse

SimplyCLICK SBI

ड्रायव्हींग लायसन्स

ड्रायव्हींग लायसन्स मिळवण्यासाठी आधी आरटीओमध्ये जावे लागत होते. यामध्ये नागरिकांचा बराच वेळ वाया जात होता. त्यामुळे आता आरटीओची मान्यता असलेल्या ड्रायव्हींग स्कूलमध्ये तुम्ही ड्रयव्हींग शिकत असाल तर तेथूनच तुम्हाला ड्रायव्हींग लायसन्स देखील दिले जाणार आहे. यामध्ये १८ वर्षांखालील मुलांना वाहन चालवण्यासाठी दिल्यास २५ हजारांचा दंड तसेच २५ वर्षांसाठी परवाना रद्द करण्यात येणार आहे.

आधार कार्ड अपडेट

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी UIDAI कडून ते मोफत केले जात होते. मात्र येत्या १४ जूनपर्यंतच याची मुदत देण्यात आली आहे. या तारखेनंतर जर तुम्ही आधारकार्ड अपडेट केले तर त्यासाठी तुम्हाला आधार केंद्रावर ५० रुपये द्यावे लागतील. हा बदल १४ जूनपासून लागू होणार आहे.

Rule Change From Today
Flight New Rule: विमान प्रवाशांसाठी खुशखबर! आता मुलांना मिळणार स्वतंत्र जागा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com