ॲपल ही सर्वात प्रसिध्द कंपनी आहे. ॲपल युझरचं ॲपल प्रोडकवर खूप प्रेम आहे . त्यामुळे येत्या ९ सप्टेंबरला रात्री १०:३० वाजता iPhone16 'ग्लो टाइम 'इव्हेंटमध्ये लाँच होणार आहे. नवीन आयफोन रिलीज होणार म्हणून युझरसमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. ॲपलने iPhone16चे चार मॅाडेल्स काढले आहेत. iPhone16, iPhone16 Plus, iPhone16 Pro, iPhone16 Pro Max अशी त्यांची नावे आहेत . यदांचा हा नवीन iPhone 16 ग्राहकांच्या भेटीस येणार आहे.
iPhone ची किंमत
ॲपल हबने नुकत्याच iPhone 16च्या किंमती सांगितल्या आहेत . iPhone 16 च्या बेस मॅाडेलची किंमत 67,100 रुपये असू शकते. iPhone16 Plus ची किंमत सुमारे 75,500 रुपये असेल. तसेच 256GB iPhone16 Pro ची किंमत 92,300 रुपये असण्याची शक्यता आहे. iPhone16 Pro Max ची किंमत 1,00,700 रुपयांनी सुरु होईल . या किमती यूएस मार्कटसाठी लीक झाल्या असून भारतात आयफोन 16 ची किंमत खूप जास्त असेल. त्यामुळे iPhone16 Pro आणि Pro Max ची किंमत एकतर समान असेल किंवा प्रीमियम फिचरसमुळे त्यांच्या किंमतीत वाढ होऊ शकते.
मागच्या वर्षी रिलीज झालेल्या iPhone15 Pro आणि iPhone15 Pro Max च्या डिस्प्लेची साइज ६.१ आणि ६.७ इंच होती. या वर्षी रिलीज होणाऱ्या iPhone16 Pro आणि iPhone16 Pro Max चा डिस्प्ले ६.२७ आणि ६.८६ इंच असण्याची शक्यता आहे.
ॲपलचा हा नवीन स्मार्टफोन अनेक आत्याधुनिक फीचर्ससह बाजारात लाँच होणार आहे. मागील सीरीजपेक्षा या स्मार्टफोनमध्ये चांगले फीचर्स मिळणार आहे. यामध्ये एआयचे देखील फीचर मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.