भारतातील बाजारात जॉकी, रुपा, डॉलरसह अनेक इनरवेअर्स ब्रँण्ड्सच्या विक्रीमध्ये ५५ टक्क्यांची घसरण झालीय. इनरवेअर्सच्या विक्रीत घसरण झाल्यामुळे देशाच्या इकोनॉमीवर परिणाम होऊ लागलाय. एका रिपोर्टनुसार अंडरवेअरचा सेल घसरला तर डेटिंग वेबसाईटची चांदी होत असल्याचं समोर आलंय. याचं काय समीकरण आहे, हे आपण जाणून घेऊ..
अंडरवेअर्स फक्त शरीररासाठी नाही तर देशाच्या इकोनॉमीसाठी सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. अंडरवेअर्सच्या विक्रीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असतो. गेल्या काही दिवसांपासून भारतातील बाजारात अंडरवेअर्सच्या विक्रीत घसरण झालीय. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झालाय. त्यात सर्वाधिक आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे अंडरवेअर्सच्या विक्रीचा सेल खाली आला तर डेटिंग वेबसाईटची चांदी होत असते. वाचून धक्का बसला असेल, पण तुम्ही जे वाचलं ते बरोबर वाचलंय. अंडरवेअर्सच्या विक्रीचा अर्थव्यवस्थेशी संबंध आहे. (Latest business News)
इकोनॉमिक्स टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, देशात रुपा, डॉलर, जॉकी अशा काही ब्रँण्डच्या इनरवेअर्सच्या विक्रीत घसरण झालीय. दरम्यान विक्रीत घसरण झाली तर अर्थव्यवस्थेतही घसरण होत असते. देशातील अर्थव्यवस्था खाली येत असल्याचं संकेत पुरुषाच्या अंडरवेअर इंडेक्स (Mens underwear Index)मध्ये दिसतं. अर्थव्यवस्थेत घसरण झाल्यानंतर देशातील पुरुष मंडळी अंडरवेअर्सवर इतका खर्च करत नाहीत. तर त्या पैशात ते इतर आवश्यक वस्तूंची खरेदी करत असतात. आता तुम्ही म्हणाल यात डेटिंग वेबसाईटचा काय संबंध.
इकोनॉमी इंडिकेटर्सनुसार, जेव्हा देशाची इकोनॉमी घसरत असते. तर इनरवेअर्सची विक्रीदेखील घसरत असते. याचा फायदा डेटिंग वेबसाईटवर होत असतो. वेबसाईटवर होणारा हा परिणाम सकारात्मक असतो. यात डेटिंग वेबसाईटच्या कमाईत वाढ होत असते. जेव्हा मंदी येते तेव्हा लोकांच्या नोकऱ्या जात असतात. लोकांचा कामधंदा बंद झाला तर ते घरात बसून राहतात. हा खाली वेळ घालवण्यासाठी ते डेटिंग वेबसाईटला भेट देत असतात. यामुळे डेटिंग वेबसाईटची चांदी होत असते.
वर्ष २००९ मध्ये अमेरिकेच्या बाजारात घसरण झाली होती. त्यावेळी मॅच डॉट कॉमचा चौथ्या तिमाहीचा नफा गेल्या सात वर्षांतील सर्वाधिक होता. याच काळात लोकांचा रोजगार गेला होता त्यामुळे ते स्वत:ला व्यस्त ठेवण्यासाठी डेटिंग वेबसाईटवर वेळ घालवत असायचे. अमेरिकेची ऑनलाईन डेटिंग सर्व्हिस Match.comने आपल्या डेटिंग आणि मंदीच्या दरम्यान एक पॅटर्न सांगितला. कंपन्या जेव्हा अडचणीत येतात तेव्हा कर्माचाऱ्यांची डेटिंग वाढत असते. तर सामान्य व्यक्ती आपले दु: ख दूर करण्यासाठी याचा वापर करतात.
याआधी वर्ष २००८ साली आर्थिक मंदी आली होती तेव्हा डेटिंग साइटवरील युझर्स खूप वाढले होते. चौथ्या तिमाहीतील युझर्सस हे ७ वर्षांत जितके युझर्स येत असतात तितकी संख्या त्या चौथ्या तिमाहीत होती. वर्ष २००१ मध्ये सप्टेंबरमध्ये हल्ला झाला होता त्यावेळी देखील Match.com वरील ट्रॅफिक वाढली होती. दरम्यान अमेरिका ते युरोप पर्यंतच्या देशांवर आर्थिक संकटाचं सावट आहे. अमेरिकेतील बँकिंग सेक्टरही अडचणीत आहे. मंदीमुळे येथील अनेक बँका बंद झाल्या आहेत. अशात भारतातील बाजारात अंडरवेअर्सची विक्री कमी होत आहे. त्यामळे आपल्या देशावरी आर्थिक संकट येणार आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.