
ITR Income Tax Notice : प्राप्तिकर परतावा विवरणपत्र (ITR) ३१ जुलै २०२३ पर्यंत भरता येणार आहे. आयटीआर भरण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. जर मुदतीपूर्वी आयटीआर भरला नाही तर, दंड भरावा लागू शकतो. दरम्यान, आयटीआरमध्ये चुकीची माहिती भरल्याने आतापर्यंत १ लाख करदात्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. आता त्यांच्याविरोधात कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, आतापर्यंत सुमारे १ लाख लोकांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. आयटीआर भरताना चुकीची माहिती दिल्याचे आढळले आहे, अशांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.
या सर्व नोटिसांवर मार्च २०२४ पर्यंत कारवाई केली जाणार आहे. अर्थमंत्री(Finance Minister) निर्मला सीतारामन यांच्या म्हणण्यानुसार, प्राप्तिकर विभाग या नोटिसांवर कार्यवाही करत आहे. येत्या काही दिवसांत या कामात अजून वेग येईल. गेल्या वर्षीच्या तुलनेत आयटीआर(ITR) भरणाऱ्या करदात्यांच्या संख्येत यंदा समाधानकारक वाढ झाली आहे.
कर परतावा अर्ज भरण्याची प्रक्रिया सोपी
येत्या काही दिवसांत कर विभागाने पाठवलेल्या नोटिसांची प्रकरणे पारदर्शक आणि जबाबदारीने जलदगतीने निकाली काढली जातील, असे आश्वासन अर्थमंत्र्यांनी दिले आहे. अर्थमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, तंत्रज्ञानामुळं यंत्रणेचा वापर करणे सोपे झाले आहे. आधी भरलेले फॉर्म उपलब्ध असल्याने कर रिटर्न भरणे एक स्नॅप बनले आहे. इतकेच नाही तर या माध्यमातून लोकांना त्यांच्या उत्पन्नाच्या सर्व स्त्रोतांची माहिती मिळते.
कर संकलन तिपटीने वाढले
महसूल सचिव संजय मल्होत्रा म्हणाले की, पंतप्रधान(Prime Minister) मोदींच्या कार्यकाळात कर संकलन तिपटीने वाढले आहे. हा आकडा पाच लाख कोटी रुपयांवरून १५ लाख कोटी रुपयांवर पोहचला आहे. त्यामागील कारणही त्यांनी स्पष्ट केले. करदात्यांची संख्याही वाढली आहे, तसेच विभागाकडून करदात्यांना अनेक सुविधाही दिल्या जात आहेत. त्यामुळे त्यांना कर भरण्यात कोणतीही अडचण येत नाही, असे त्यांनी सांगितले.
प्राप्तिकर विभागाकडून बारकाईनं छाननी
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (CBDT) अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी सांगितले की, प्राप्तिकर विभागाकडून करदात्यांच्या परताव्याची माहिती अद्ययावत केली जात आहे. तसेच बारकाईने छाननी केली जाते. करदात्यांच्या समस्या सोडवण्याचे कामही केले जात आहे. वेबसाइटमुळे करदात्यांना आयटीआर भरणे सोयीचे झाले आहे.
प्राप्तिकर दिनानिमित्त विभागाकडून सर्व सोयीसुविधांची माहिती देण्यात आली. प्राप्तिकर परतावा प्रक्रिया पूर्ण होण्यास मागील वर्षी सरासरी २६ दिवस लागत होते. पण आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये सरासरी १६ दिवस लागतात. आगामी काळात हा कालावधी आणखी कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही विभागाकडून सांगण्यात आले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.