Kisan Credit Card: फक्त ४ टक्के व्याजदरानं मिळेल ३ लाख रुपयांपर्यंतचं कर्ज; कसा कराल KCC साठी अर्ज

KCC for Farmers: किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या मदतीने शेतकरी सहजपणे कर्ज मिळवू शकतात.
Kisan Credit Card
Kisan Credit CardSaam Tv
Published On

Apply For Kisan Credit Card:

किसान कर्ज पोर्टलद्वारे किसान क्रेडिट कार्ड (KCC)धारकांना तारण न देता आणि अनुदानासह कर्ज मिळते. किसान क्रेडिट कार्डद्वारे, शेतकरी त्यांच्या कृषी उद्देशांसाठी किंवा त्यांच्या गरजांसाठी अत्यंत स्वस्त दरात कर्ज घेऊ शकतात. केसीसीद्वारे मिळणारे कर्ज सवलतीच्या व्याजावर दिले जाते. जे शेतकरी या कार्डद्वारे कर्ज घेऊन वेळेवर परतफेड करतात त्यांना विशेष सवलतदेखील मिळते. (Latest Business News)

काय आहे किसान क्रेडिट कार्ड

किसान क्रेडिट कार्ड योजना ही शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येते. शेतीच्या कामांसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत लागली तर ते याच्या माध्यमातून सहज कर्ज घेतील. या योजनेच्या मदतीने शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके किंवा शेतीची उपकरणे खरेदी करता येतात. या क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना कोणत्याही हमीशिवाय १.६ लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. याद्वारे शेतकरी ३ वर्षात ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात.

या कार्डद्वारे शेतकरी गरजेनुसार कर्ज घेऊ शकतात. या किसान क्रेडिट कार्डची वैधता ५ वर्षे असते. ज्या शेतकऱ्यांकडे केसीसी म्हणजे किसान क्रेडिट कार्ड असेल त्यांना गावातील कोणत्याही सावकाराकडे पैसे मागण्याची गरज नाहीये.

शेतकरी किसान क्रेडिट कार्डद्वारे ५ वर्षांत ३ लाख रुपयांपर्यंतचे अल्प मुदतीचे कर्ज घेऊ शकतात. शेतकऱ्यांना ९ टक्के दराने कर्ज मिळते, मात्र सरकार त्यावर २ टक्के अनुदान देते. यानुसार त्यावर ७ टक्के व्याजदर होत असते. जर शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जाची परतफेड केली तर त्यांना आणखी ३ टक्के सूट दिली जाते. अशाप्रकारे कर्जावर फक्त ४ टक्के व्याज भरावं लागतं.

क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करावा

  • सर्वात आधी https://pmkisan.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळवर जावे लागेल.

  • येथे किसान क्रेडिट कार्डचा अर्ज डाउनलोड करावा.

  • या अर्जात तुम्हाला जमिनीचे कागदपत्रे आणि पिकांची माहिती भरावी लागेल.

  • तसेच तुम्ही इतर बँक किंवा इतर शाखेकडून दुसरे कोणते किंवा किसान क्रेडिट कार्ड बनवलं आहे का नाही हे सांगावे लागेल.

  • अर्ज भरल्यानंतर सबमिट करा.

  • त्यानंतर तुम्हाला संबंधित बँकेकडून किसान क्रेडिट कार्ड मिळेल.

कागदपत्रे

  • मतदार ओळखपत्र

  • पॅन कार्ड

  • पासपोर्ट

  • आधार कार्ड

  • ड्रायव्हिंग लायसन्स

कोण आहे KCCसाठी पात्र

  • अर्ज करणाऱ्या अर्जदारांच्या नावावर शेती असावी.

  • भाडेकरू शेतकरी, भागपीक, शेतकरी स्वयं-सहायता गट असेल तर ते अर्ज करू शकतात.

  • जे शेतकरी शेती किंवा पशुपालन करतात.

  • ज्या मच्छीमारांकडे नोंदणीकृत बोट किंवा इतर कोणत्याही प्रकारची मासेमारी नौका असेल

  • ज्यांच्याकडे मासेमारीसाठी आवश्यक परवाना आहे.

  • पोल्ट्री करणारे शेतकरी

  • डेअरीचा व्यवसाय करणारे शेतकरी.

Kisan Credit Card
SBI Chocolate Scheme: कर्जाचा हप्ता चुकला का? चिंता नको! SBI ने आणली जबरदस्त योजना

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com