Honda Dio Scooter : स्पोर्टी लूक, जास्तीचं मायलेज! नवीन 'Dio' स्कूटर लॉन्च, किती आहे किंमत?

Honda Dio Scooter New Features : होंडा कंपनीने भारतीय बाजारामध्ये Honda Dio स्कूटर नव्याने लॉन्च केली आहे. या स्कूटरमध्ये कोणते नवे फिचर्स आहेत, याची किंमत किती आहे? जाणून घ्या..
Honda Dio Scooter New Features
Honda Dio Scooter New FeaturesHonda website
Published On

Honda Dio Scooter Updates : होंडा कंपनीने लोकप्रिय Honda Dio स्कूटरला मार्केटमध्ये लॉन्च केले आहे. नवीन अपडेटनंतर ही स्कूटर पूर्वीपेक्षा जास्त मायलेज देईल असा दावा होंडा कंपनीने केला आहे. कंपनीने स्कूटर स्टँडर्ड आणि डीलक्स या दोन प्रकारात लॉन्च केली आहे. लेटेस्ट होंडा डियो स्कूटरची किंमत 74,930 रुपयांपासून सुरु होणार आहे असल्याची माहिती समोर आली आहे.

होंडा डियो स्कूटरमध्ये 109.51 सीसी क्षमता असलेले सिंगल-सिलेंडर PGM-Fi इंजिन बसवण्यात आले आहे. हे इंजिन OBD2B मानकांवर आधारित डिझाइनवरुन केले आहे. होंडा डियोमधील नवीन इंजिन 7.9 BPH ची पावर आणि 9.03 NM चे टॉर्क जनरेट करते. मायलेज वाढवण्यासाठी कंपनीने स्कूटरमध्ये आयडलिंग स्टॉप सिस्टीम देखील समाविष्ट केली आहे.

या स्कूटरमध्ये ४.२ इंचाचा टीएफटी डिस्प्ले बसवण्यात आला आहे. या डिस्प्लेवर स्कूटरचा वेग, ट्रिक मीटर, रेंज आणि मायलेज या गोष्टी चालक पाहू शकणार आहे. डिस्प्ले सोबत डियो स्कूटरमध्ये USB टाइप सी चार्जिंग पोर्ट बसवण्यात आला आहे. यामुळे स्कूटर चालवताना चालकाला स्मार्टफोन चार्ज करता येईल.

Honda Dio Scooter New Features
UPI Payment: इंटरनेटशिवाय UPI पेमेंट कसं करायचं? या सोप्या स्टेप्स करा फॉलो

होंडा स्कूटरचा लूक मागच्या व्हर्जनसारखा आहे. ही स्कूटर इम्पीरियल रेड मेटॅलिक, पर्ल इग्नियस ब्लॅक, पर्ल इग्नियस ब्लॅक + पर्ल डीप ग्राउंड ग्रे, मॅट मार्वल ब्लू आणि मॅट एक्सिस ग्रे मेटॅलिक रंग या पाच रंगांमध्ये उपलब्ध आहे. त्याच्या टॉप डिलक्स व्हेरियंटमध्ये अलॉय व्हील देण्यात आले आहेत. स्कूटरच्या डिलक्स व्हर्जनची किंमत स्टॅन्डर्ड व्हर्जनपेक्षा जास्त आहे.

Honda Dio Scooter New Features
WhatsApp: व्हॉट्सॲपचे नवीन फीचर्स, सेल्फी घेताच तयार होणार स्टिकर्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com