अदानी समूहाला सेबीकडून क्लीन चिट, गौतम अदानी म्हणाले, सत्यमेव जयते!
adani Group news updatesaam tv

Adani Group News : हिंडनबर्ग प्रकरणी अदानी ग्रुपला सेबीकडून क्लीन चिट, गौतम अदानी म्हणाले...

SEBI clean chit to Adani Group : सेबीकडून क्लीन चिट मिळाल्यानंतर अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा सत्याचा विजय आहे, असे सांगतानाच हिंडनबर्गचे सर्व आरोप निराधार होते, असे ते म्हणाले.
Published on
Summary
  • सेबीकडून अदानी समूहाला क्लीन चिट

  • हिंडनबर्ग रिसर्चनं केले होते गंभीर आरोप

  • चौकशीत एकही आरोप सिद्ध झाला नाही

  • सेबीच्या क्लीन चिटनंतर गौतम अदानींची प्रतिक्रिया

अदानी समूहाला भांडवली बाजार नियामक संस्था सेबीकडून (SEBI) मोठा दिलासा मिळाला आहे. सेबीनं अदानी समूहाला हिंडनबर्ग रिसर्च प्रकरणात क्लीन चिट दिली आहे. स्टॉक मॅनिपुलेशन आणि इनसाइडर ट्रेडिंग यांसारखे आरोप हिंडनबर्गकडून अदानी समूहावर करण्यात आले होते. मात्र, तपासात एकही आरोप सिद्ध झाला नाही, असे सेबीचे म्हणणे आहे.

२४ जानेवारी २०२३ रोजी हिंडनबर्ग रिसर्चनं एक अहवाल प्रसिद्ध केला होता. अदानी समूहाच्या कंपन्यांकडून समभागांच्या किंमती भरमसाठ पद्धतीने वाढवणे, निधीचा चुकीचा वापर करणे आणि ऑडिट फ्रॉड आदी गोष्टी केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. हिंडनबर्गच्या आरोपांनंतर सेबीनं केलेल्या तपासात एकही आरोप सिद्ध होऊ शकला नाही. त्यामुळे सेबीने अदानी समूहाला क्लीन चिट दिली आहे.

हा सत्याचा विजय! गौतम अदानी काय म्हणाले?

सेबीकडून क्लीन चिट मिळाल्यानंतर अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हा सत्याचा विजय आहे, असे त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. सखोल चौकशीनंतर सेबीनं हिंडनबर्गचे सर्व दावे निराधार होते, असे स्पष्ट केले आहे. पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा ही अदानी समूहाची ओळख आहे. हिंडनबर्गच्या आरोपांनंतर ज्या गुंतवणूकदारांनी पैसे गमावले, त्यांचे दुःख आम्ही समजू शकतो. खोटे आरोप करणाऱ्यांनी या देशाची माफी मागितली पाहिजे, असेही गौतम अदानी म्हणाले.

सेबीच्या तपासातून काय निष्पन्न झालं?

हिंडनबर्गच्या आरोपानंतर सेबीनं तपास केला. अदानी समूहाकडून कुठल्याही नियमांचे उल्लंघन झालेले नाही. अदानी समूहाला दोषी ठरवता येईल, असा कोणताही पुरावा मिळालेला नाही, असे सेबीच्या तपासातून समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. हिंडनबर्गच्या अहवालात अदानी समूहाच्या ज्या कंपन्यांची नावं समोर आली होती, त्यांना सेबीच्या या क्लीन चिटमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

अदानी समूहाला सेबीकडून क्लीन चिट, गौतम अदानी म्हणाले, सत्यमेव जयते!
Rahul Gandhi PC Highlights: मतचोरीचे अ‍ॅडिशन- डिलीशन पुराव्यासह दाखवले, राहुल गांधींचे 10 गंभीर आरोप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com