
मोदी सरकारने पहिल्या अर्थसंकल्पात सोन्यावरील कस्टम ड्युटी कमी केल्यानंतर देशात सोन्याच्या किमतीत झपाट्याने घसरण होताना दिसत आहे. त्यानंतर सोन्याच्या किमती ६७ हजार प्रति किलोपर्यंत कमी झालेल्या बघायला मिळाल्या आहेत. मात्र या घसरणनंतर पिवळ्या धातूच्या किमती ऑगस्ट महिन्यात वाढायला सुरुवात झाल्यानंतर सोन्याच्या किमतीनी आत्तापर्यंतचा उच्चांक गाठलेला बघायला मिळत आहे. गेल्या आठ दिवसात एकीकडे मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. तर देशांतर्गत बाजारपेठेत मात्र सोनं स्वस्त झालेलं बघायला मिळत आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX)चा दर २५ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर पर्यंत असणार दर हा १० ग्रॅमसाठी ७५ हजार ९८८ रुपये होता. मात्र त्यात आता आठवडाभरतच झपाट्याने वाढ होताना दिसत असून हा दर ७७ हजार १२१ रुपये प्रती १० ग्रॅम असा झाला आहे. म्हणजे एकाच आठवड्यात सोन्याच्या किमतीत १० ग्रॅममागे १ हजार १३३ रुपयांची वाढ झाली आहे.
एकीकडे मल्टी कमोडिटी एक्सचेंजच्या सोन्याच्या किमती वाढत असतानाच दुसरीकडे मात्र देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात घसरण बघायला मिळत आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) आकडेवारीनुसार मागील आठवड्यात २५ नोव्हेंबरला शुद्ध सोन्याची किंमत (999) प्रति 10 ग्रॅमसाठी 77 हजार 081 इतकी होती. मात्र आठ दिवसात 76 हजार 740 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी ही किंमत झाली आहे. त्यामुळे 24 कॅरेट सोन्याचा दर हा 341 रुपयांनी कमी झाला आहे.
पूर्ण आठवड्यातील सोन्याच्या दराचा चढ उतार पहिला तर त्यात, 25 नोव्हेंबरला 77 हजार 081 रुपये असलेला भाव २६ तारखेला 75 हजार 690 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला. तर 27 नोव्हेंबरला पुन्हा 76 हजार 175 रुपयांवर सोन्याचे भाव गेले. 28 नोव्हेंबरला 76 हजार 287 रुपये इतका सोन्याचा दर होता. ३ टक्के जीएसटी आणि मेकिंग चार्ज शिवाय देशांतर्गत बाजारात सोन्याची किंमत आहे. मेकिंग चार्जेस वेगवेगळे असल्यामुळे देशातील विविध शहरांमध्ये सोन्याच्या किमतीत बदल दिसून येत आहेत.
शुक्रवारी मुंबईत सोन्याच्या 24 कॅरेट सोन्याच्या दरात 10 रूपये प्रति 10 ग्रॅम इतकी वाढ होऊन 77 हजार 490 रुपये किंमत झालेली दिसली. तर 22 कॅरेट सोनं 10 ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव 71 हजार 040 रुपये इतका होता.
गुणवत्ता किंमत
24 कॅरेट रु 76 हजार 740/10 ग्रॅम
22 कॅरेट रु 74 हजार 900/10 ग्रॅम
20 कॅरेट रु 68 हजार 300/10 ग्रॅम
18 कॅरेट रु 62 हजार 160/10 ग्रॅम
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.