Gautam Adani Net Worth : अदानींने एका दिवसात कमवले तब्बल 6.5 अब्ज डॉलर्स, श्रीमंतांच्या यादीत पुन्हा गाठला वरचा क्रमांक

Gautam Adani News : अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी पुन्हा एकदा जगातील टॉप 20 सर्वात श्रीमंत अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
Gautam Adani Net Worth
Gautam Adani Net WorthSaam Tv
Published On

Gautam Adani Net Worth :

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी पुन्हा एकदा जगातील टॉप 20 सर्वात श्रीमंत अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळवले आहे. ब्लूमबर्गकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत भारतीय असलेल्या अदानी यांनी एका दिवसात त्याच्या संपत्तीत सुमारे 6.5 अब्ज डॉलरची भर घातली आहे. त्यांची एकूण संपत्ती 66.7 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे.

यासह अदानी यांनी या यादीत ज्युलिया फ्लेशर कोच अँड फॅमिली (64.7 अब्ज डॉलर्स), चीनचे झोंग शानशान (64.10 अब्ज डॉलर्स) आणि अमेरिकेचे चार्ल्स कोच (60.70 अब्ज डॉलर्स) यांना मागे टाकले आहे. गौतम अदानी याआधी 22 व्या स्थानावर होते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Gautam Adani Net Worth
Tax Saving Scheme : सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करा अन् लाखो रुपये टॅक्स वाचवा; जाणून घ्या सविस्तर

गौतम अदानी यांच्या 10 सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली आहे आणि त्यामुळे मंगळवारी बाजार भांडवलात 1 लाख कोटींहून अधिकची उसळी दिसून आली. 28 नोव्हेंबर रोजी समूहाचे एकूण बाजार भांडवल 11,31,096 कोटी होते, जे शुक्रवारच्या 10,27,114.67 कोटींवरून 1.04 लाख कोटींनी वाढले आहे. 24 जानेवारीच्या 19.19 लाख कोटी रुपयांवरून ग्रुप मार्केट कॅप अजूनही 41 टक्क्यांनी खाली आहे. (Latest Marathi News)

संपत्तीत किती आहे घट?

अदानी यांच्या मालमत्तेमध्ये वार्षिक 53.80 अब्ज डॉलरची घट अजूनही आहे. अमेरिकेतील शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर ही घसरण झाली होती. या वर्षाच्या सुरुवातीला हिंडेनबर्गने अदानी समूहावर अनेक गंभीर आरोप केले होते. यानंतर, सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये 150 अब्जची घसरण नोंदवली गेली. मुकेश अंबानी 89.5 अब्ज डॉलर्स संपत्तीसह अब्जाधीशांच्या यादीत 13 व्या क्रमांकावर आहेत. 2023 मध्ये आतापर्यंत त्याच्या अंदाजे एकूण संपत्तीत 2.34 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.

Gautam Adani Net Worth
Marathi Business Ideas : सुरु करा 'हा' व्यवसाय, दरमहा कमावू शकता 75,000 रुपये; सरकारही करत आहे मदत

हिंडेनबर्ग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवल्यानंतर अदानींच्या शेअर्सला वेग आला आहे. बाजार नियामक सेबीने सर्व 24 प्रकरणांमध्ये तपास पूर्ण करावा, असे न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालय केवळ मीडिया रिपोर्ट्सवर अवलंबून राहून अदानी प्रकरणातील सेबीच्या तपासावर संशय व्यक्त करू शकत नाही, असं न्यायालयाने म्हटलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com