Car Price: कारच्या किंमती आणखी कमी होणार; नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा

Nitin Gadkari on Car Price: नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. आता इलेक्ट्रिक कारच्या किंमती कमी होणार आहे. येत्या काही महिन्यात या किंमती पेट्रोलच्या कारच्या किंमतीएवढ्या होणार आहेत.
Nitin Gadkari
Nitin Gadkari saam tv
Published On

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. आता कारच्या किंमती अजून कमी होणार आहे. इलेक्ट्रिक कारच्या किंमती अजून स्वस्त करणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. इलेक्ट्रिक कारचा वापर आणखी वाढवण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Nitin Gadkari
EPFO मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! PF काढण्याच्या नियमात करणार बदल; वाचा सविस्तर

नितीन गडकरी यांनी सोमवारी सांगितले की, ४ ते ६ महिन्यात इलेक्ट्रिक कारच्या किंमती आणि पेट्रोल कारच्या किंमती सारख्या करणार आहोत. यामुळे आता येत्या काही महिन्यात इलेक्ट्रिक कारच्या किंमती घसरणार आहेत. यामुळे ऑटोमोबाईल सेक्टरवर परिणाम होणार आहे. यामुळे इंधन आयातावरील खर्च कमी होईल. याचसोबत पर्यावरणालाही फायदा होईल.

इलेक्ट्रिक कारच्या किंमती कितीने कमी होणार? (EV Car Price Fall)

नितीन गडकरी यांनी सांगितले की, पुढच्या काही महिन्यात इलेक्ट्रिक कार आणि पेट्रोल कारच्या किंमती समान होती. सरकार गेल्या अनेक दिवसांपासून बॅटरी टेक्नोलॉजी, चार्जिंग इन्फ्रास्टक्चर आणि घरगुती मॅन्युफॅक्चरिंगला प्रोत्साहन देत आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती कमी होतील.

नितीन गडकरी यांनी सांगितले की, भारताला जर आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर करायचे असेल तर त्यांना फॉसिल फ्युएलवर अवलंबून राहायला नाही पाहिले. सध्या भारत देश २२ लाख कोटी रुपयांचे इंधन आयात करते, यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण येत आहे. जर इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केला तर हा खर्च खूप कमी होईल.

Nitin Gadkari
Nitin Deshmukh : लक्षवेधी मांडू न देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष मॅनेज; राहूल नार्वेकरांवर आमदार नितीन देशमुख यांचा गंभीर आरोप

क्लीन एनर्जीला नवी दिशा

नितीन गडकरी यांनी सांगितले की, इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या वापरामुळे फक्त पर्यावरणाला नव्हे तर लाखो तरुणांना रोजगारदेखील निर्माण होणार आहे. याचसोबत बॅटरी रिसायक्लिंग आणि स्थानिक मॅन्युफॅक्चरिंगमधील गुंतवणूक वाढणार आहे. यामुळे भारत जगभरात EV हब होण्यासाठी मदत होईल.

Nitin Gadkari
SCSS Scheme: फक्त व्याजातून कमवा २ लाख ४६ हजार रुपये; योजना नक्की आहे तरी काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com