Retirement Planning: EPF, NPS की PPF; कोणत्या योजनेत मिळणार सर्वाधिक परतावा? कॅल्क्युलेशन वाचा

Retirement Planning Scheme: प्रत्येकजण भविष्यासाठी गुंतवणूक करतात. दरम्यान, तुम्ही सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करु शकतात. तुम्ही ईपीएफ, एनपीएस आणि पीपीएफ या योजनेत गुंतवणूक करु शकतात.
Investment Tips
Investment TipsGoogle
Published On

प्रत्येकजण आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व्हावे, यासाठी पगारातील काही ठरावीक रक्कम बाजूला काढून ठेवतात. परंतु ही रक्कम जर तुम्ही एखाद्या चांगल्या योजनेत गुंतवली तर तुम्हाला त्याचे चांगले व्याजदर मिळते. सरकारी योजनांमध्ये जर गुंतवणूक केली तर तुम्हाला खूप फायदा होईल. सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला चांगला परतावादेखील मिळणार आहे. यासाठी तुमच्याकडे नॅशनल पेन्शन सिस्टीम, पब्लिक प्रोव्हिडंट फंड आणि एम्प्लॉय प्रोव्हिडंट फंड (ईपीएफ) हे चांगले पर्याय आहेत. कोणती योजना तुमच्यासाठी बेस्ट आहे ते जाणून घ्या.

Investment Tips
Government Scheme : तरुणांना महिन्याला मिळणार ₹१०००; पंतप्रधान मोदींनी लाँच केली नवी योजना

ईपीएफ (EPF)

प्रायव्हेट क्षेत्रात काम करणारे कर्मचारी ईपीएफमध्ये गुंतवणूक करतात. त्यांच्या पगारातील काही रक्कम ते ईपीएफ खात्यात जमा करतात. तेवढेच पैसे नियोक्तादेखील जमा करतो. या योजनेत दर वर्षी व्याजदर बदलते. सध्या या योजनेत ८.२५ टक्के व्याजदर मिळते.

पीपीएफ (PPF)

तुम्ही पीपीएफ योजनेतदेखील गुंतवणूक करु शकतात. यामध्ये तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर चांगला फंड मिळतो. या योजनेत तुम्ही १५ वर्षांसाठी गुंतवणूक करायची आहे. या योजनेत तिमाही आधारावर व्याजदर ठरवले जाते. या योजनेत तुम्हाला सध्या ७.१ टक्के व्याजदर मिळते. या योजनेच्या मॅच्युरिटीवरील रक्कमेवर टॅक्सदेखील लागत नाही.

Investment Tips
Government Scheme: या सरकारी योजनेत महिलांना दर महिन्याला मिळणार २१०० रुपये; आजपासून नवीन पोर्टल सुरु

एनपीएसमधील गुंतवणूक (NPS Investment)

नॅशनल पेन्शन सिस्टीम योजनेततुम्हाला चांगला परतावा मिळतो. एनपीएसमधील गुंतवणूक ही मार्केट लिंक्ड असते. यामध्ये तुम्ही जी गुंतवणूक करतात ती शेअर मार्केट, सरकारी सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक केली जाते. यामध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळतो. सेवानिवृत्तीच्या वेळी तुम्हाला ६० टक्के रक्कम दिली जाते आणि उरलेली ४० टक्के रक्कमेतून तुम्हाला पेन्शन दिली जाते.

Investment Tips
SCSS Scheme: फक्त व्याजातून कमवा २ लाख ४६ हजार रुपये; योजना नक्की आहे तरी काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com