Work Stress :नोकरी उठली जीवावर; टार्गेट पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव

work place stress: नोकरीत यश मिळवण्यासाठी अधिकाधिक काम करण्याचा ट्रेंड झाला आहे. प्रत्येकाला स्वतःला मेहनती सिद्ध करायचे असते, पण तसे करणे जीवघेणे ठरत आहे.
work place stress
The Silent Killersaam tv
Published On

सध्याच्या स्पर्धेच्या युगात नोकरी करणाऱ्यांवर कमालीचा ताण वाढलाय. टार्गेट पूर्ण करण्याचा हा दबाव कधी-कधी असह्य होऊन काही जण टोकाचं पाऊल उचलत आहेत. देशभरात नुकत्याच घटडेल्या घटना चिंता वाढवणाऱ्या आहेत. उत्तर प्रदेशातील झाशी येथे एका फायनान्स कंपनीच्या एरिया मॅनेजरने गळफास लावून आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये वसुली टार्गेटचा दबाव, पगार कापण्याची धमकी ही कारणे होती. पुण्यामध्येही 26 वर्षीय चार्टर्ड अकाउंटंट तरुणीचा कामाच्या ताणामुळे मृत्यू झाला आहे. HCLटेकच्या नागपूर कार्यालयातील वरिष्ठ विश्लेषकाचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

सर्वाधिक कामाचे तास भारतात

30 देशांच्या सर्वेक्षणात असे दिसून आले की सर्वाधिक तास काम करणाऱ्या देशांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात 51 टक्के लोक आठवड्यात सुमारे 46.7 तास काम करतात. देशातील 60% लोक कामाच्या ओझ्यामुळे खूप थकलेले आणि चिंताग्रस्त आहेत. एका अहवालात असे आढळून आले होते की मुंबई हे जगातील सर्वात मेहनती शहर आहे.

work place stress
SBI Scheme: स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! ४०० दिवसांच्या एफडीमध्ये गुंतवणुकीचा कालावधी वाढवला

जास्तीत तास काम केल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो?

जास्त काम केल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो. उच्च रक्तदाबाची समस्या असू शकते. ज्यामुळे स्ट्रोक, हृदयरोग आणि मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका वाढतो.तसेच नैराश्याला बळी पडण्याचा शक्यता वाढते. मधुमेह होण्याचा धोका वाढू शकतो. हा तणाव कमी करण्यासाठी डॉक्टर काही उपाय सुचवतात.

तज्ज्ञांचा सल्ला

तज्ज्ञ डॉ. अर्चना मोहरे, कमला नेहरु हॉस्पिटल, पुणे या म्हणाल्या, "जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या एका अभ्यासात आठवड्यात 35 ते 40 तास काम करणाऱ्यांच्या तुलनेत 55 तास किंवा त्याहून अधिक काम करणाऱ्यांसाठी मृत्यूचा धोका अनेक पटींनी वाढतो. जास्त कामामुळे दरवर्षी १ ते २ लाख मृत्यू होतात. त्यामुळे ही विषारी कार्यसंस्कृती टाळायची असेल तर आपल्याला वेळेच्या व्यवस्थापनावर विशेष लक्ष द्यावे लागेल." यामुळे तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे ताण कमी होईल. आरोग्य उत्तम असेल तरच आपण प्रभावी काम करु शकतो. म्हणतात ना सर सलामत तो पगडी पचास...

Edited By: Sakshi Jadhav

work place stress
Ladki Bahin Yojana: खुशखबर! लाडक्या बहिणींना १० ऑक्टोबरला मिळणार ३००० रुपये; कसं? जाणून घ्या

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com