YouTubeवर पैसे कमवणे आता अवघड! नियम बदलले, वाचा सविस्तर

YouTube Earnings: यूट्यूब आपल्या कमाईच्या नियमांमध्ये मोठे बदल करणार असून हे १५ जुलैपासून लागू होतील. या नव्या नियमांमुळे युट्यूबवरून पैसे कमवणं अधिक कठीण होणार आहे.
YouTube
YouTube
Published On

YouTube आता आपल्या कमाईच्या धोरणात मोठा बदल करत असून हे नवीन नियम १५ जुलैपासून लागू होणार आहेत. यानुसार, मोठ्या प्रमाणात बनवलेल्या किंवा ऑटोमेटेड कंटेंटवर यूट्यूब अधिक कठोर पावले उचलणार आहे. त्यामुळे यापुढे यूट्यूबवरून पैसे कमावणं आधीइतकं सोपं राहणार नाही, विशेषतः कॉपी केलेला कंटेट चालणार नाही.

१५ जुलैपासून YouTube आपले कमाईचे नियम बदलत असून आता फक्त मूळ आणि नवीन कंटेटवर कमाईस परवानगी दिली जाणार आहे. मोठ्या प्रमाणात एकसारखी किंवा पुनरावृत्त व्हिडिओ कंटेट ओळखून तिच्यावर कारवाई केली जाईल. यूट्यूबचे उद्दिष्ट प्रेक्षकांना प्रत्येक चॅनेलवरून युनिक कंटेंट देण्याचे आहे. या नव्या धोरणांमुळे अनेक जुन्या पद्धतीने व्हिडिओ तयार करणाऱ्यांचे उत्पन्न कमी होऊ शकते.

YouTube
Recharge Offer: फक्त ४०० रुपयांत 400GB डेटा, आजच करा रिचार्ज

यूट्यूबच्या नव्या धोरणानुसार, व्हिडिओवरून कमाई करण्यासाठी तो व्हिडिओ पूर्णतः मूळ असणे गरजेचे आहे. जर कंटेंट दुसरीकडेून घेतला असेल, तर त्यात स्पष्ट बदल करून मूल्यवर्धन करणे आवश्यक ठरेल. YouTube चे मत आहे की निर्मात्यांनी फक्त दृश्य नव्हे, तर माहितीपूर्ण व प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारी सामग्री तयार करावी, ज्यामुळे गुणवत्तापूर्ण आणि ओरिजिनल कंटेंटचा प्रचार वाढेल.

YouTube
Renault Triber: 7 सीटर कार मार्केट गाजवणार, येणार सर्वात स्वस्त फॅमिली कार

YouTube आपल्या प्लॅटफॉर्मवरील कंटाळवाण्या व पुनरावृत्त कंटेंटपासून मुक्त होण्यासाठी आता अधिक कठोर धोरण लागू करत आहे. हे धोरण AI वापरून तयार केलेल्या कंटेंटवरही लागू होईल. सपोर्ट पेजवर यूट्यूबने स्पष्ट केलं आहे की 'मोठ्या प्रमाणात उत्पादित आणि पुनरावृत्ती होणारा कंटेंट' ओळखून तिच्यावर निर्बंध लावले जातील. त्यांचा उद्देश निर्मात्यांनी नेहमीच मूळ, दर्जेदार व प्रामाणिक कंटेंट तयार करावा, हाच आहे.

YouTube
Airtel Recharge: Wi-Fi युजर्ससाठी एयरटेलचा स्वस्तात मस्त रिचार्ज प्लान, जाणून घ्या काय फायदा मिळणार?

२०२०-२१ मध्ये यूट्यूबने शॉर्ट्सच्या रूपाने टिकटॉकसारखे व्हिडिओ सुरू केले, ज्यामुळे पुनरावृत्ती होणाऱ्या कंटेंटचा ट्रेंड वाढला. अशा प्रकारचे व्हिडिओ आधी टिकटॉकवर लोकप्रिय होते. मात्र आता यूट्यूब आपले वेगळेपण टिकवण्यासाठी आणि दर्जेदार कंटेंटला प्रोत्साहन देण्यासाठी कमाईचे धोरण बदलून अशा एकसारख्या, पुनरावृत्त व्हिडिओंवर कारवाई करण्याचा निर्णय घेत आहे.

अलिकडे YouTube आणि इतर प्लॅटफॉर्मवर AI-निर्मित व्हिडिओंचा मोठा उद्रेक झाला आहे. आता अशा व्हिडिओंवरही यूट्यूबचे नवीन कठोर नियम लागू होण्याची शक्यता आहे. विशेषतः जेव्हा AI-आधारित आवाज वापरून इतरांच्या व्हिडिओंवर प्रतिक्रिया दिली जाते. सुधारित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये हे व्हिडिओ समाविष्ट होऊ शकतात, मात्र याबाबत अद्याप स्पष्टता मिळालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com