केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातनी आहे. कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात लाढ होणार आहे. परंतु ही वाढ ४ टक्क्यांपेक्षा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकार लवकरच महागाई भत्त्यात वाढीची घोषणा करणार आहे. (DA Hike)
केंद्र सरकार लवकरच कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढवणार आहे. ७ व्या वेतन आयोगानुसार हा महागाई भत्ता वाढला जाणार आहे. सामान्यपणे वर्षात दोनवेळा जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्त्याबाबत घोषणा केली जाते. यावेळी ही घोषणा उशीरा होत आहे. तरीही काही महिन्यांचा महागाई भत्ता मिळणार आहे. यावेळी महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ होण्याची शक्यता कमी आहे.
यावेळी किती वाढ होणार?
यावेळी महागाई भत्ता ५३.३५ टक्के होण्याची शक्यता आहे. सध्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना ५० टक्के महागाई मिळत आहे. तर तो आता वाढणार आहे. ३ टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवला जाऊ शकतो. (DA Hike To Government Employees)
पगार किती रुपयांनी वाढेल?
महागाई भत्ता वाढल्यावर कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे.जर महागाई भत्त ५३ टक्क्यांपर्यंत वाढला तर ज्या लोकांचे मासिक वेतन ५५,२०० रुपये आहे त्यांच्या पगारात २९,२५६ रुपयांची वाढ होईल.
केंद्र सरकार महागाई भत्त्याबाबत सप्टेंबर महिन्यात घोषणा करु शकतो. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.