Cigarette Price Hike: मोठी बातमी! सिगारेट, पान मसालाच्या किंमती वाढणार; एका Cigaretteसाठी किती पैसे मोजावे लागणार?

Cigarette and Pan Masala Price Hike From 1st February: सिगारेटच्या किंमतीत वाढ होणार आहे. या पदार्थांवर एक्साइज ड्युटी वाढवण्यात आली आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या किंमती कितीने वाढणार हे जाणून घ्या.
Cigarette Price Hike
Cigarette Price HikeSaam Tv
Published On
Summary

सिगारेटचे दर वाढणार

तंबाखूजन्य पदार्थांवर एक्साइज ड्युटी वाढवणार

१ फेब्रुवारी २०२६ पासून नवीन दर लागू होणार

केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तंबाखूजन्य पदार्थांवर अतिरिक्त एक्साइज ड्युटी लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता तंबाखूजन्य सर्व पदार्थांच्या किंमती वाढणार आहे. १ फेब्रुवारी २०२६ पासून हे नवीन दर लागू होणार आहे. यामुळे सिगारेट, तंबाखू या पदार्थांच्या किंमती वाढणार आहेत.

Cigarette Price Hike
EPFO: कोणत्या कारणासाठी काढू शकतात PF चे पैसे? मर्यादा किती? वाचा EPFO चा नियम काय सांगतो

अर्थ मंत्रालयाने ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री सिगारेट, पान मसाल्याच्या किंमती वाढणार असल्याची घोषणा केली. सिगारेट, पान मसाला हे पदार्थ ४० टक्क्यांपेक्षा जास्त जीएसटी दरात येतात. हे अतिरिक्त एक्साइज ड्युटीमध्ये येतात. यामुळेच सरकारे हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नवीन नियमांनुसार सरकारने पॅकिंग स्वरुपात किंवा पॅक असणाऱ्या तंबाखू, गुटखा यासाठी केंद्रीय उत्पादन शुल्क कायदा कलम 3A अंतर्ग, त अधिसूचना जाहीर केली आहे.

सिगारेट महागणार

सिगारेटच्या लांबीनुसार त्याची किंमत वाढणार आहे. प्रति १००० सिगारेटच्या काड्यांवर २०५० ते ८५०० रुपयांपर्यंत अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. ४० टक्के जीएसटीदेखील आकारला जाणार आहे. यामुळे सिगारेटची किंमत दुप्पट होईल. सरकारला तंबाखू उत्पानदनावरील कर प्रणाली आणखी कडक करायची आहे.

बिडीवर १८ टक्के कर

सिगारेट पान मसाल्यांवर जरी ४० टक्के जीएसटी दर आकारला जात असला तरी बिड्यांवर १८ टक्के दर कायम आहे.

Cigarette Price Hike
EPFO PF Transfer: नोकरी बदलली तरी PF ट्रान्सफर होणार विना टेन्शन; फक्त ५ दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण

सिगारेटची किंमत कितीने वाढणार? (How Mucj 1 Cigarette Price Hike)

एक सिगरेटची किंमत २.०५ ते ८.० रुपयांपर्यंत महाग होणार आहे. त्यामुळे १८ रुपयांना मिळणार सिगारेटची किंमत २१ किंवा त्यापेक्षा जास्त होईल. लांब आणि प्रिमियम सिगारेटवर एक्साइज ड्युटी वाढवण्यात आली आहे. प्रत्येक कंपनीच्या टॅक्स दरानुसार ही एक्साइज ड्युटी लादली जाणार आहे.

Cigarette Price Hike
Rule Change 1st January: थेट तुमच्यावर परिणाम, नव्या वर्षांपासून १० नियमात मोठा बदल, वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com