iPhone 15: चायनाची 'मेड इन इंडिया'च्या प्रोडक्टवर जळफळाट; आयफोन १५ विषयी चिनी मीडिया पसरवतेय अफवा

iPhone 15 Rumors: नव्याने लाँच झालेल्या मेड-इन-इंडिया iPhone 15 विषयी चिनी सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात आहेत.
iPhone 15
iPhone 15saam tv
Published On

iPhone 15 rumors on iPhone 15:

नव्याने लाँच झालेल्या मेड-इन-इंडिया iPhone 15 विषयी चिनी सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात आहेत. सोशल मीडियावर या अफवांना पूर आलाय. बाजारात नुकताच मेड इन इंडिया आयफोन १५ लाँच झाला. हा फोन घेण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केल्याचं आपण पाहिलं. या आयफोन १५ ची क्रेझ मात्र चायनाला आवडली नाहीये. चिनी सोशल मीडियामध्ये आयफोन १५ विषयी अफवा पसरवल्या जात आहेत. (Latest Business News )

चिनी-निर्मित आयफोन १५ केवळ युरोपियन आणि अमेरिकन बाजारपेठांमध्ये उपलब्ध असेल, तर आयफोन १५ ची भारतीय आवृत्ती चिनी बाजारपेठेत लॉन्च केली जाईल, असं उपहासात्मक दावा सोशल मीडियावर केला जात आहे. अफवांमुळे चिनी ग्राहक भारतीयांविरुद्ध अपशब्द वाईट टिप्पण्या करत आहेत आहेत. चीनमधील सोशल मीडियावर भारतीयांवर उपहासात्मक टीका करण्यात आल्यात.

तसेच भारतातील आयफोनच्या गुणवत्ता चांगली नसल्याची टीप्पणी केलीय. भारतात बनवलेले ५० टक्के मोबाईल परत करण्यात आल्याची अशीच एक अफवा चीनच्या नेटकऱ्यांकडून पसरवण्यात आलीये. दरम्यान Weibo वर एक ट्रेंडिंग हॅशटॅग तयार झालाय. चिनी सोशल मीडिया साईट वेबो पोस्ट वापरकर्ते बाजारात नव्यानं आलेल्या आयफोन १५ विषयी व्यंगात्मक टिप्पण्या करत आहेत. एका वापरकर्त्याने अशीच एक उपहासात्मक टीका केलीय. हा फोन दुर्मिळ दिसत आहे.

हा फोन दुर्मिळ दिसत आहे. नवीन आयफोन मिळाला आणि त्याच्यावरचे कव्हर काढल्यावर तुम्हाला आमटीचा वास येईल. काळजी करु नका. ते एकदम स्वच्छ आणि आरोग्यदायी आहे. जे लोक स्वच्छतेविषयी खूप जागृक असतील ते भारतीय मजूर लोक एका हाताने भात भाजी खातील आणि डोळे पुसत मोबाईल पाहतील. भारतीय लोक हे खूप अस्वछ राहतात. त्यांच्या वस्तूमधून आमटी आणि भाताचा वास येतो. तसाच वास आयफोन १५ ला येईल. भारतीय मजूर लोक एका हाताने भात भाजी खातील आणि डोळे पुसत मोबाईल पाहतील. तरी भारतात बनवलेले आयफोन १५ निर्जंतूक आहेत असं म्हटलं जाईल.

तसेच अ‍ॅपल पहिल्यावेळेस मेड इंडिया आयफोन्स लाँचिंगच्या वेळी विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला होता. याचा उपयोग त्यांनी अफवा पसरवण्यासाठी केला. दरम्यान Weibo वर एक ट्रेंडिंग हॅशटॅग तयार झालाय. तुम्ही चीनमध्ये नवीन फोन खरेदी केल्यास, तुम्हाला भारतात बनवलेला iPhone मिळू शकतो, असा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.

या हॅशटॅगच्या अंतर्गत अनेक विनोद आणि आयफोन १५ विषयी चुकीची माहिती पसवलीय जातेय. जर एखाद्या चुकून भारतात बनलेला आयफोन घेतला तर काय करावे याविषयी सूचना दिल्या आहेत. भारत आग्नेय आशियाई देशातून उत्पादन क्षमतेच्या बाबतीत सर्वात मागासलेला असल्याचं एका वापरकर्त्यांनं म्हटलं आहे.

iPhone 15
Apple New Series : iPhone चा ग्राहकांना दणका! लॉन्च होण्यापूर्वीच किंमत ऐकूण डोकं फिरेल, वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com