Central Government: मोदी सरकारचं कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, ती एक मागणी मान्य, UPS, NPS मध्ये केले बदल

Central Government Decision for Employees: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्ती निधीची रक्कम गुंतवणूकीसाठी पर्याय देण्यात आले आहेत.
narendra modi
narendra modisaam tv
Published On

केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे.केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांची मागणी मान्य केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचारी मागणी करत आहेत. आता राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजे एनपीएस आणि युनिफाइड पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी दोन नवीन गुंतवणूकीचे पर्याय उपलब्ध केले आहे.

narendra modi
Government Scheme: या सरकारी योजनेत महिलांना मिळतात २१०० रुपये; अर्ज करण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस

केंद्र सरकारने एनपीएस आणि यूपीएसअंतर्गत जीवन चक्र 75 (LC 75) आणि संतुलित जीवन चक्र (BLC) हे दोन पर्याय दिले आहेत. हा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांना लक्षात ठेवून घेण्यात आली आहे. सेवानिवृत्तीच्या नियोजनात अधिक लवचिकता निर्माण करण्यासाठी हे पर्याय उपलब्ध केले आहेत.निवृत्ती निधीचे काय करायचे यासाठी हा पर्याय डिझाइन केलेला आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठीचा हा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. याआधी फक्त खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना विविध ठिकाणी गुंतवणूक करायचे पर्याय मिळायचे. मात्र, आता सरकारी कर्मचाऱ्यांनाही हा पर्याय मिळणार आहे.

पेन्शनचे दोन पर्याय (Pension Options)

लाइफ सायकल

यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त २५ टक्के इक्विटीमध्ये गुंतवू शकतात. ही गुंतवणूक ३५ वर्षांच्या वयापासून ५५ वर्षांपर्यंत कमी होते.

बॅलन्स लाइफ सायकल

यामध्ये तुम्ही वयाच्या ४५ वर्षापासून इक्विटी गुंतवणूक कमी होऊ शकतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांची इच्छा असल्यास तुम्ही जास्त काळ इक्विटीमध्ये गुंतवणूक करु शखतात.

narendra modi
SCSS Scheme: फक्त व्याजातून कमवा २ लाख ४६ हजार रुपये; योजना नक्की आहे तरी काय?

सध्याचा पर्याय जीवन चक्र (LC 75)

यामध्ये जास्तीत जास्त ७५ टक्के इक्विटीमध्ये गुंतवणूक करु शकतात. ही गुंतवणूक ३५ वर्षांपासून ५५ वर्षापर्यंत कमी होते.

एलसी-50

एलसी-50 मध्ये तुम्ही ५० टक्के रक्कम इक्विटीमध्ये गुंतवणूक करु शकतात.

narendra modi
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ५ वर्षात मिळणार ५ लाखांचं व्याज; वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com