
नोकरीपेक्षा व्यवसायात भरपूर नफा आहे असं अनेक तरुण म्हणतात. स्वत:चा मोठा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न देखील पाहतात. मात्र व्यवसाय करायचा म्हटलं की त्यासाठी मोठं भांडवल लागतं. त्यामुळे आम्ही व्यवसाय केला नाही अशी सबब देणारेही अनेक आहेत. मात्र, एका महिलेने फक्त तूप विकून दरमहा लाखो रुपये कमवण्याचा विक्रम बनवला आहे. (Latets Marathi News)
तूप विकून कोणी महिन्याला २० लाख रुपये कमावू शकतं का? डोळ्यांवर आणि कानांवर विश्वास बसणार नाही, पण कमलजीत कौर यांनी हे साध्य करून दाखवलंय. कमलजीत कौर या मुळच्या पंजाबमधील आहेत. त्या लग्न करून मुंब्र्यात रहायला आल्या. लुधियानात त्यांच्या घरात भरपूर दूध, पनीर आणि तूप असायचं.
पण तसचं तूप मुंबई, ठाण्यात मिळत नव्हतं. तेव्हा कमलजीत यांनी किम्मुस किचनची स्थापना केली. तूप बनवण्याची कौर यांची घरची पद्धत वेगळी होती. कुठलंही तूप लोणीपासून बनतं. पण कमलजीत यांनी तूप बनवण्यासाठी बिलोना पद्धत वापरली. यात रात्री दही लावलं जातं. त्यातून लोणी वेगळं केलं जातं.
आज कौर यांना दिवसाला तूपाच्या हजारो ऑर्डर्स येतात. तूप विकून त्या महिन्याला २० लाख रुपये कमावतात. त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरलाय. अनेकांनी त्यांच्या व्यवसायातून प्रेरणा घेतली आहे.
स्वत:चा व्यवसाय करण्यासाठी भांडवल तर महत्वाचं आहे. मात्र त्याचसोबत तुमच्याकडे वेगळेपणा आणि नाविन्य देखील असणं गरजेचं आहे. या गोष्टींची काळजी घेतल्यास तुमचा व्यवसाय देखील नक्कीच यशस्वी होईल.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.