BSNL Recharge Plan : एक रुपयात एक दिवस, BSNLनं लाँच केला स्वस्तात मस्त प्लान

BSNL 1 Rupee Recharge Plan : बीएसएनएलकडे १०० रुपयांपेक्षा कमी किमतीत उत्तम रिचार्ज योजना उपलब्ध आहेत. कंपनीने ९१ रुपयांचा प्लान लाँच केला आहे. ज्यात तुम्हाला एक दिवसाची १ रुपयात रिचार्ज व्हिलिडिटी मिळत आहे.
BSNL 1 Rupee Recharge Plan
BSNL Recharge PlanSAAM TV
Published On

बीएसएनएल सातत्याने स्वस्त रिचार्ज प्लान लाँच करत आहे. बीएसएनएलचे रिचार्ज प्लान खासगी कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त असतात. त्यामुळे आता खाजगी कंपन्यांचे रिचार्ज प्लान स्वस्त झाल्यानंतर बीएसएनएल बाजारात नवा रिचार्ज प्लान घेऊन आला आहे. बीएसएनएलच्या नव्या प्लान मध्ये एक रुपयाला एक दिवसाची रिचार्ज व्हॅलिडिटी उपलब्ध आहे. तसेच या प्लान मध्ये भरपूर इंटरनेट डेटा मिळणार आहे.

९१ रुपयांचा प्लान

बीएसएनएलकडे १०० रुपयांपेक्षा कमी किमतीत उत्तम रिचार्ज प्लान उपलब्ध आहे. यात कंपनीने ९१ रुपयांचा आणखी एक प्लान लाँच केला आहे.

रिचार्ज प्लान वैशिष्ट्ये

  • रिचार्ज व्हॅलिडिटी ९० दिवसांपुरता मर्यादित आहे.

  • या प्लानमध्ये विशेष म्हणजे एक दिवसाची १ रुपयात रिचार्ज व्हॅलिडिटी मिळत आहे.

  • ज्या लोकांना फक्त आपला नंबर सक्रिय ठेवायचा आहे त्यांच्यासाठी ही उत्तम योजना आहे.

  • या प्लानमध्ये १५ पैसे प्रति मिनिट दराने कॉलिंग करता येते.

  • १ एमबी डेटा ११ पैसे दराने मिळणार आहे.

BSNL 1 Rupee Recharge Plan
Jio Recharge Plan: जिओचे 'हे' आहेत सर्वाधिक स्वस्त रिचार्ज प्लान;मिळणार अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा; फक्त २०० रुपयांपासून सुरु

१०७ रुपयांचा प्लान

बीएसएनएलचा १०७ रुपयांचा प्लान देखील आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना अमर्यादित कॉलिंग सेवा मिळत नाही.

रिचार्ज प्लान वैशिष्ट्ये

  • ग्राहकांना ३५ दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल.

  • या प्लानमध्ये २०० मिनिटे कॉलिंग मिळते.

  • या प्लानमध्ये ३५ दिवसांसाठी ३जीबी डेटा उपलब्ध आहे.

BSNL 1 Rupee Recharge Plan
Realme C63 5G Launch : १० हजारांपेक्षा कमी किंमत, रिअलमीचा नवा स्मार्टफोन, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com