APY Scheme: पती-पत्नीने दररोज करावी 14 रुपयांची बचत, दोघांना दरमहा प्रत्येकी मिळेल 5,000 रुपये पेन्शन

Atal Pension Yojana Details: पती-पत्नीने दररोज करावी 14 रुपयांची बचत, दोघांना दरमहा प्रत्येकी मिळेल 5,000 रुपये पेन्शन
Atal Pension Yojana Details In Marathi
Atal Pension Yojana Details In MarathiSaam Tv
Published On

Atal Pension Yojana Details In Marathi:

सगळेच आर्थिकदृष्ट्या समृद्ध भविष्याचे स्वप्न पाहतात. अशातच निवृत्तीनंतर आपले जीवन आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी आधीपासूनच बरेच लोक बचत करण्यास सुरवात करतात. निवृत्तीनंतर तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आर्थिक समज चांगली असणं गरजेचं आहे.

जर तुम्ही वृद्धापकाळासाठी आतापासूनच आर्थिक नियोजन केलं नाही, तर सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला तुमचे जीवन जगताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यातच आज आम्ही तुम्हाला भारत सरकारच्या एका अतिशय जबरदस्त योजनेबद्दल सांगणार आहोत. अटल पेन्शन योजना असे या योजनेचे नाव आहे. ही योजना देशात खूपच लोकप्रिय आहे. यामध्ये गुंतवणूक करून तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

Atal Pension Yojana Details In Marathi
Pension Scheme: भारी नाही तर जबरदस्त आहे 'ही' योजना, दररोज 7 रुपये जमा करून आयुष्यभर मिळेल 5000 रुपये पेन्शन

तुम्ही अटल पेन्शन योजनेसाठी १८ ते ४० वयोगटातील अर्ज करू शकता. नोंदणीनंतर तुम्हाला योजनेत किती पैसे गुंतवावे लागतील? ही रक्कम तुम्ही योजनेसाठी कोणत्या वयात अर्ज करत आहात? त्याआधारे निर्णय घेतला जाईल.  (Latest Marathi News)

तुम्ही वयाच्या १८ व्या वर्षी या योजनेसाठी अर्ज केल्यास. अशा परिस्थितीत तुम्हाला दरमहा २१० रुपये गुंतवावे लागतील. जर तुम्ही आणि तुमची पत्नी मिळून दररोज ७+७ = १४ रुपये वाचवत असाल आणि तुम्ही ६० वर्षांचे होईपर्यंत प्रत्येक महिन्याला २१० + २१० = ४२० रुपये गुंतवले, तर वयाच्या ६० वर्षांनंतर पती-पत्नी दोघांनाही दरमहा दहा हजार रुपये पेन्शन मिळू शकते. तुम्ही https://enps.nsdl.com/eNPS/NationalPensionSystem.htm वर भेट देऊन या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. (Utility News)

Atal Pension Yojana Details In Marathi
LIC Schemes: LIC च्या 'या' योजनेत फक्त एकदाच जमा करावे लागतील पैसे, आयुष्यभर मिळेल 50,000 रुपये पेन्शन

अटल पेन्शन योजनेत अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, मोबाइल नंबर, ओळखपत्र, कायम पत्ता पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, बँक खात्याचे पासबुक इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com