Sony, Samsung, Oneplus; 32 ते 65 इंचांपर्यंतच्या टीव्हीवर मिळत आहे मोठी सूट

Amazon Sale: जर तुम्ही अगदी कमी किंमतीत नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. Amazon India वर, तुम्ही 32 ते 65 इंचाचा स्मार्ट टीव्ही चांगल्या डीलवर खरेदी करू शकता.
Sony Bravia
Sony BraviaSaam Tv

Amazon Discount Offers:

जर तुम्ही अगदी कमी किंमतीत नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. Amazon India वर, तुम्ही 32 ते 65 इंचाचा स्मार्ट टीव्ही चांगल्या डीलवर खरेदी करू शकता. या टीव्हीवर चांगली बँक सूटही दिली जात आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही स्वस्तात टीव्ही खरेदी करू शकता.

ऑफरमध्ये उपलब्ध असलेल्या टीव्हीच्या यादीमध्ये सॅमसंग, सोनी, एलजी आणि वनप्लसच्या स्मार्ट टीव्हीचाही समावेश आहे. हे टीव्ही जबरदस्त डिस्प्लेसह डॉल्बी ऑडिओसह येतात. चला तर मग जाणून घेऊया कोणता टीव्हीवर काय आहे ऑफर...

Sony Bravia
Moto G04s Features: 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा; Moto G04s स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमत

OnePlus 163 cm (65 inches) Q Series 4K Ultra HD QLED Smart Google TV 65 Q2 Pro (Black)

हा टीव्ही Amazon डीलमध्ये 79,999 रुपयांना उपलब्ध आहे. बँक ऑफरमध्ये तुम्हाला यावर 2750 रुपयांपर्यंत सूट मिळेल. तसेच तुम्हाला टीव्हीवर 4 हजार रुपयांपर्यंतचा कॅशबॅकही मिळू शकतो. एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही याची किंमत 2,000 रुपयांनी कमी करू शकता. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला या टीव्हीमध्ये 4K QLED डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्ले डॉल्बी व्हिजनला सपोर्ट करतो. पॉवरफुल साउंडसाठी कंपनीने टीव्हीमध्ये 70 वॅट 2.1 चॅनल साउंड आउटपुट दिला आहे.

Sony Bravia 139 cm (55 inches) 4K Ultra HD Smart LED Google TV KD-55X74L (Black)

हा सोनी टीव्ही 57,990 रुपयांना सेलमध्ये उपलब्ध आहे. कंपनी टीव्हीवर 2750 रुपयांची बँक सूट देत आहे. तुम्हाला टीव्हीवर 2900 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देखील मिळत आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही याची किंमत 7500 रुपयांनी कमी करू शकता. फीचर्सच्या बाबतीत हा टीव्ही जबरदस्त आहे. यामध्ये तुम्हाला 60Hz च्या रिफ्रेश रेटसह 4K अल्ट्रा HD डिस्प्ले मिळेल. कंपनी या टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओसह 20 वॉट साउंड आउटपुट देत आहे.

Sony Bravia
Vivo T3X 5G Launch: प्रतीक्षा संपली! पॉवरफुल कॅमेरासह 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येत आहे जबरदस्त स्मार्टफोन

Samsung 108 cm (43 inches) Crystal 4K Vivid Pro Ultra HD Smart LED TV UA43DUE77AKLXL

सॅमसंगचा हा 43 इंच 4K टीव्ही 35,990 रुपयांना उपलब्ध आहे. बँक ऑफरमध्ये कंपनी या टीव्हीवर 2500 रुपयांपर्यंत सूट देत आहे. टीव्हीवर 2,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनसही दिला जात आहे. कॅशबॅक ऑफरमध्ये तुम्हाला 1800 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त लाभ मिळू शकतो. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा टीव्ही 50Hz च्या रीफ्रेश रेटसह 4K अल्ट्रा HD डिस्प्लेसह येतो. यात 24W च्या आउटपुटसह Q-Symphony स्पीकर देण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com