Surrogacy: ज्याद्वारे प्रीती झिंटा बनली आई; जाणून घ्या सरोगसी म्हणजे काय?

बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा ही काही दिवसांपूर्वीच सेरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांची आई बनली आहे. सरोगसी मदर बनण्याच्या यादीत प्रीती एकटी नाही, आत्तापर्यंत बॉलिवूड मधील अनेक जोडपे सरोगसीच्या माध्यमातून पालक बनले आहेत.
Surrogacy: ज्याद्वारे प्रीती झिंटा बनली आई; जाणून घ्या सरोगसी म्हणजे काय?
Surrogacy: ज्याद्वारे प्रीती झिंटा बनली आई; जाणून घ्या सरोगसी म्हणजे काय?Twitter/@realpreityzinta
Published On

बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा ही काही दिवसांपूर्वीच सेरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांची आई बनली आहे. सरोगसी मदर बनण्याच्या यादीत प्रीती एकटी नाही, आत्तापर्यंत बॉलिवूड मधील अनेक जोडपे सरोगसीच्या माध्यमातून पालक बनले आहेत. सरोगसीमध्ये कोणतेही विवाहित जोडपे मूल जन्माला घालण्यासाठी महिलेचा गर्भ भाड्याने देऊ शकतात. सरोगेसी पालकत्व कोणीही स्वीकारू शकत. उदाहरणार्थ, जर जोडप्याला स्वतःची मुले होऊ शकली नाहीत, तर स्त्रीच्या जीवाला धोका आहे किंवा एखाद्या स्त्रीला स्वतःला मूल होऊ द्यायचे नसेल तर हा पर्याय वापरला जातो.

हे देखील पहा-

सरोगसी म्हणजे काय-

सरोगसीमध्ये एक जोडपे मूल होण्यासाठी महिलेचा गर्भ भाड्याने घेऊ शकतात. सरोगसीमध्ये, एक स्त्री तिच्या किंवा तिच्या दात्याच्या अंड्यांद्वारे दुस-या जोडप्यासाठी गर्भवती होते. सरोगसीद्वारे मूल होण्यामागे अनेक कारणे आहेत. उदाहरणार्थ, जर जोडप्याला स्वतःचे मूल होऊ शकत नसेल, महिलेच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते किंवा गर्भधारणेमुळे इतर समस्या उद्भवू शकतात किंवा स्त्रीला स्वतःला मूल व्हायचे नसेल तर या पर्यायाचा अवलंब करू शकतात. जी स्त्री दुसऱ्याचे मूल तिच्या पोटात घेऊन वाढवते तिला सरोगेट मदर असे म्हणतात.

सरोगसीमध्ये स्त्री आणि मूल मिळवू पाहणाऱ्या जोडप्यामध्ये करार केला जातो. या अंतर्गत, या गर्भधारणेतून जन्मलेल्या मुलाचे कायदेशीर पालक हे सरोगसी केलेले जोडपे आहेत असाच होतो. सरोगेट आईला गर्भधारणेदरम्यान स्वतःची काळजी घेण्यासाठी आणि वैद्यकीय गरजांसाठी पैसे दिले जातात जेणेकरून ती गर्भधारणेदरम्यान स्वतःची काळजी घेऊ शकेल.

सरोगसीचे दोन प्रकार आहेत-

सरोगसी देखील दोन प्रकारची आहे. पहिल्या सरोगसीला पारंपारिक सरोगसी असे म्हणतात. या सरोगसीमध्ये ज्यामध्ये सरोगसीचा अवलंब करणाऱ्या महिलेच्या अंड्यांशी वडिलांचे किंवा दात्याचे शुक्राणू जुळवले जातात. या सरोगसीमध्ये सरोगेट मदर ही बायोलॉजिकल मदर (जैविक मदर) असते.

दुसरीकडे, गर्भधारणेच्या सरोगसीमध्ये Gestational surrogacy, सरोगेट मातेचा मुलाशी अनुवांशिक संबंध नसतो, म्हणजेच गर्भधारणेमध्ये सरोगेट मातेच्या अंड्याचा वापर केला जात नाही. सरोगेट मदर ही बाळाची जैविक आई नसते, ती फक्त बाळाला जन्म देते. यामध्ये वडिलांचे शुक्राणू (Male Sperms) आणि आईची अंडी किंवा दात्याचे शुक्राणू आणि अंडी (Female Eggs) यांचे मिश्रण चाचणी ट्यूबद्वारे केल्यानंतर सरोगेट आईच्या गर्भाशयात Utrus प्रत्यारोपण केले जाते.

भारतातील सरोगसी नियमन - सरोगसीचा गैरवापर पाहता, आता त्याबाबत भारतात सर्व नियम निश्चित करण्यात आले आहेत. आर्थिक अडचणींमुळे बहुतांश गरीब महिला सरोगेट माता होण्याचे प्रमाण जास्त आहे. व्यावसायिक सरोगसी Commercial surrogacy या प्रकारावर सरकारने बंदी घातली आहे. 2019 मध्येच Commercial surrogacy वर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर सरोगसीचा पर्याय केवळ मदतीसाठी खुला ठेवण्यात आलं आहे.

या अंतर्गत परदेशी, एक पालक, घटस्फोटित जोडपे, लिव्ह-इन पार्टनर आणि एलजीबीटी समुदायातील लोकांसाठी सरोगसीचे मार्ग बंद करण्यात आले आहेत. सरोगसीसाठी, महिलेकडे वैद्यकीयदृष्ट्या फिट प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, तरच ती सरोगेट माता बनू शकते. दुसरीकडे, सरोगसीचा अवलंब करणाऱ्या जोडप्यांकडे ते वंध्यत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र असावे लागते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com