Mumbai News: मुंबईकरांसाठी आता 'वाॅटर टॅक्सी'ची सेवा

मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. १७ फेब्रुवारीपासून मुंबई ते नवी मुंबई जल प्रवासासाठी वॉटर टॅक्सीचा पर्याय मुंबईकरांना उपलब्ध होणार आहे
Mumbai News: मुंबईकरांसाठी आता 'वाॅटर टॅक्सी'ची सेवा
Mumbai News: मुंबईकरांसाठी आता 'वाॅटर टॅक्सी'ची सेवा- Saam TV
Published On

मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे . १७ फेब्रुवारीपासून मुंबई ते नवी मुंबई (Navi Mumbai) जल प्रवासासाठी वॉटर टॅक्सीचा पर्याय मुंबईकरांना उपलब्ध होणार आहे. १७ फेब्रुवारीला केंद्रीय बंदर आणि जलवाहतूकमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते वॉटर टॅक्सीचे उद्घाटन केले जाणार आहे , त्यानंतर सेवा नागरिकांसाठी खुली केली जाणार आहे. (Water Taxi Service will be available for mumbai from this month)

मुंबई आणि आजूबाच्या परिसराला रेल्वे , रस्ते वाहतुकीप्रमाणे जल वाहतुकीतून जोडण्याचा प्रस्ताव गेल्या कित्येक दशकांपासून प्रलंबित होता. पण या जल वाहतुकीच्या पर्यायासाठी मुंबईकरांना (Mumbai) आणखी वाट पाहण्याची गरज नाही. कारण येत्या १७ तारखेपासून मुंबईत वॉटर टॉक्सिच्या प्रवासाचा शुभारंभ होणार आहे.

केंद्रीय जहाज वाहतूक मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत या सेवेचं उद्घाटन होणार आहे . या नव्या जल वाहतुकीमुळे सध्या नवी मुंबई ते दक्षिण मुंबईला रस्त्याने जाण्यासाठी दीड ते दोन तास लागतात, तर रेल्वेने (Railway) सुमारे ५० ते ६० मिनिटे लागतात . जलमार्गाने हा प्रवास अवघ्या ४० ते ४५ मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे .

Mumbai News: मुंबईकरांसाठी आता 'वाॅटर टॅक्सी'ची सेवा
Valentine's Day: उदयनराजेंचा I Love U मेसेज आला का? शिवेंद्रराजे म्हणाले...!

सुरुवातीला जल मार्ग सेवा कुठे आणि कशी उपलब्ध असेल ?

- सुरुवातीच्या टप्प्यात तीन मार्गांवर वॉटर टॅक्सी धावणार

१) नेरुळ-बेलापूर-जेएनपीटी-एलिफंटा-नेरुळ,

२)डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल-जेएनएनपीटी-एलिफंटा-नेरूळ

३)डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल-बेलापूर-नेरूळ-डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल दरम्यान उपलब्ध असेल.

- टॅक्सी प्रत्येक थांब्यावर सुमारे १० मिनिटे थांबेल. मुंबईहून दर एक तासाला वॉटर टॅक्सी सेवा उपलब्ध असेल.

- प्रवाशांच्या संख्येनुसार सेवेत वाढ करण्यात येणार आहे.

- पहिल्या टप्प्यात ३२ आसनी, ४० आसनी आणि ५० आसनी अशा तीन वॉटर टॅक्सी मुंबई-नवी मुंबई- एलिफंटा या मार्गावर चालवण्यात येणार

जेटीपर्यंत कसं जाणार ?

- प्रवाशांना जेटीपर्यंत सहज नेण्यासाठी बससेवेचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

- मुंबईतील जेटीवर जाण्यासाठी सीएसएमटी स्थानकातून बसेस उपलब्ध करून देण्यात येतील.

- सीएसटी स्टेशन, गेटवे ऑफ इंडिया, नरिमन पॉइंट, चर्चगेट, वाशी स्टेशन, बेलापूर आणि जेनएनपीटीजवळ ब्रिज टॅक्सींची व्यवस्था करण्यात आली आहे.

- प्रवासी वॉटर टॅक्सीची तिकिटे ऑनलाइन खरेदी करता येणार आहे , टॅक्सी सुटण्याच्या किमान ३० मिनिटे आधी तिकीट काढावं लागणार

- ऑनलाइन व्यवहारांना चालना देण्यासाठी कंपनीने ३ हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम न स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय

Mumbai News: मुंबईकरांसाठी आता 'वाॅटर टॅक्सी'ची सेवा
रेल्वे स्टेशन प्रवेशद्वारावरील काढण्यात आलेली महापुरुषांची नावे पुन्हा द्या; शिवसेनेची मागणी

तिकीट दर किती असेल ?

- वॉटर टॅक्सीने प्रवास करण्यासाठी एकेरी प्रवाशांना ७५० रुपये मोजावे लागणार आहेत .

- दुतर्फा भाडे १२०० रुपये असेल.

- १२ हजार रुपये खर्चून मासिक पासची सुविधाही प्रवाशांना मिळणार आहे.

- टॅक्सींसाठी ग्रुप बुकिंग करणाऱ्यांना सुमारे १५ टक्के सवलत दिली जाईल.

प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासोबतच प्रवाशांच्या सुरक्षेकडेही लक्ष देण्यात आलय . याअंतर्गत प्रवाशांना ५ लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाणार आहे. नागरिकांची वाहतूक समस्येतून सुटका व्हावी यासाठी वॉटर टॅक्सींना प्रोत्साहन देण्याच्या योजनेवर सरकार काम करते आहे. सेवा सुरू करण्यासाठी प्रशासनाने ठिकठिकाणी जेटी तयार केल्या आहेत. सरकारने वॉटर टॅक्सी चालवण्याची जबाबदारी खासगी कंपन्यांवर सोपवली आहे . ही सेवा चालविण्याची जबाबदारी इन्फिनिटी हार्बर सर्विस आणि वेस्ट कोस्ट मरिन या दोन खासगी कंपन्यांवर असेल.

वॉटर टॅक्सीचा वापर वाढल्यास मुंबईकरांचा इंधनावर होणार खर्च , तसेच रस्तेवाहतुकीत होणारी वाहतुक कोंडी, रेल्वेतील गर्दी आणि इतर बऱ्याच त्रासांपासून सुटका होऊ शकणार आहे . नवी मुंबईतून मुंबई शहरात कामधंदा आणि नोकरीसाठी दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लाखांच्या घरात आहे . त्यामुळे या प्रवाशांच्या सेवेसाठी सुखकर मार्ग निवडण्याचे प्रयत्न पाठीमागील प्रदीर्घ काळापासून सुरु होते , पण हा नवा मार्ग मंबईकरांच्या पसंतीस किती पडतो हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com