
औरंगाबाद: पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर आणि आरोग्यासाठी लाभदायी असलेली सायकलिंग आता हळूहळू अनेकांच्या प्रवासासाठीचं साधन झालीय. त्यामुळे सायकल खरेदी करणाऱ्यांचा कल वाढत चाललाय पण आता अशी वेळ आलीय की, सायकल ही परवडत नाही. बघा, पेट्रोल डिझेलशी स्पर्धा करणाऱ्या सायकलच्या किंमती.
काही वर्षापूर्वी दोनचार हजारात आपल्याला हवी तशी आणि आवडीची सायकल खरेदी करायला यायची. पण आता जर तुम्ही दुकानात गेलात तर साधी सायकल ही पाच ते सात हजारात मिळतेय. थोडी फॅन्सी आणि गिअर असलेली सायकल जर घ्यायचं विचार केला तर 15 ते 50 हजार रुपये तुम्हाला मोजावे लागतात. काही सायकली तर लाखांच्यावर आहेत. त्यामुळे आता सायकल तर परवडते कुठं असं म्हणायची वेळ आलीय. (Latest Aurangabad News In Marathi)
कोरोनामुळे प्रत्येक जण आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊ लागला. कमी खर्चामध्ये उत्तम व्यायाम आणि प्रदूषण रोखण्यासाठी शहरांमध्ये सायकलचा वापर सुरू झाला. त्याच काळात पेट्रोल डिझेलचे दर अधिक वाढू लागले, त्यामुळे अनेक जण सायकल आपल्या प्रवासाचे साधन म्हणून वापरू लागले. ज्या दुकानात नेहमी शुकशुकाट असायचा तिथे सायकल घेण्यासाठी गर्दी होऊ लागली. आता त्यात किमती वाढल्यामुळे सायकल खरेदी करताना थोडा विचार करावा लागतोय.
सध्या बाजारात
साधी सायकल पाच ते आठ हजार
फॅन्सी सायकल सहा हजार ते पन्नास हजार
गिअरची सायकल बारा हजार ते पन्नास हजार
इलेक्ट्रिक सायकल पंचवीस हजार ते साठ हजार रुवयात मिळत आहे.
गेल्या वर्षभरात सायकलच्या विक्रीमध्ये मोठी वाढ झाली. मागणी वाढली, पुरवठा कमी झाला अशी स्थिती होती. त्यामुळे किमती घसघशीत वाढ झाली. आता पुरवठा जास्त आहे आणि किमती जास्त झाल्याने ग्राहक दिसेनाशे झालेत.
पेट्रोलचे दर वाढले डिझेलचे दर वाढले त्यामुळे सार्वजनिक वाहन असो किंवा खाजगी वाहनाने प्रवास करायचा असेल परवडणारा राहिलं नाही. जवळपास जाण्यासाठी सायकल साधन बनवण्याचा अनेकजण प्रयत्न करतात, आता तीही परवडण्यासारखी राहिली नाही. त्यामुळे सायकल नको रे बाबा असे म्हणण्याची वेळ आलीय.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.