Parliament Monsoon Session : पहिल्या दिवशी काय झाले?
Parliament Monsoon Session : पहिल्या दिवशी काय झाले?Twitter/ @Loksabha

Parliament Monsoon Session : पहिल्या दिवशी काय झाले?

यंदाच्या संसद अधिवेशनात सुमारे ३० विधेयके मंजूर करण्याचा केंद्रसरकारचा प्रयत्न आहे
Published on

Parliament Monsoon Session 2021 : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. बऱ्याच दिवसानंतर संसदेच्या या अधिवेशनात विरोधी पक्षांनी महागाई, कोरोना महामारी (Covid Epidemic) , शेतकरी आंदोलन (Farmers Protest) या मुद्दय़ासह पिगासस स्पायवेअर (Pegasus spyware) फोन टॅपिंग प्रकरणी अधिवेशनाच्या माध्यमातून विरोधकांनी सत्ताधारी पक्षाने सरकारला घेराव घालण्याची रणनीती तयार केली आहे. तर, यंदाच्या संसद अधिवेशनात सुमारे ३० विधेयके मंजूर करण्याचा केंद्रसरकारचा प्रयत्न आहे, त्यातील वीज दुरुस्ती विधेयकासारख्या महत्त्वाच्या विधेयकांचा समावेश आहे. आजचा अधिनवेशनाच पहिला दिवस मात्र पिगासस स्पायवेअर फोन टॅपिंग प्रकरणानेच गाजला. (Parliament Monsoon Session: What happened on the first day?)

Parliament Monsoon Session : पहिल्या दिवशी काय झाले?
विरोधकांच्या गोंधळामुळे राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज तहकूब

- पिगासस फोन टॅपिंग प्रकरणी माहिती तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांचे स्पष्टीकरण

पिगासस स्पायवेअरच्या फोन टॅपिंग प्रकरणी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला. पिगासस स्पायवेअरच्या माध्यमातून पत्रकार आणि कार्यकर्त्यांचे फोन हॅक झाल्याच्या वृत्ताबाबत माहिती तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव लोकसभेत आपला अहवाल प्रसिद्ध केला. ज्यामुळे देशाच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली. याप्रकरणी माहिती तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव लोकसभेत याबाबत आपली केंद्रसरकारची बाजू मांडली आहे. तसेच, या माध्यमातून भारतीय लोकशाहीची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी काही दिवसांपुर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही स्वयंसेवक, न्यायाधीश, काही केंद्रीय मंत्री आणि काही पत्रकारांचे फोन टॅप (Phone Tapping) केले जात असल्याचा दावा केला होता. यामुळे देशाच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली होती. धक्कादायक म्हणजे या प्रकरणी देशातील मोठमोठ्या वृत्त समुहांच्या 40 हून अधिक पत्रकारांचे फोनही टॅप केल्याची माहिती समोर आली आहे. या फोन टॅपिंगसाठी पिगासस स्पायवेअरचा (Pegasus spyware) वापर करण्यात आल्याचे समोर आहे.

''प्रसिद्ध झालेल्या अहवालातील माहितीचा हेरगिरीशी कोणताही संबंध नाही. जो रिपोर्ट प्रसिद्ध झाला आहे तो फसवण्यासाठी करण्यात आला असून त्यात कोणतेही तथ्य नाही. डेटातील माहिती पाहता त्यातील फोन नंबर्स हॅक झाल्याचे सिद्ध होत नाही. हा अहवाल चुकीचा आणि निराधार असल्याचेही एनएसओने म्हटले आहे. तसेच, अहवालात प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, अहवातील फोन नंबर हॅक केले गेले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र हे हॅकिंग पिगासस स्पायवेअरच्या माध्यामातून करण्यात आल्याची कोणतीही पुष्टी यात करण्यात आलेली नाही. आमच्या कायद्यामध्ये कोणत्याही प्रकारची पाळच ठेवणे शक्य नाही. यासाठी भारताकडे एक चांगली प्रणाली आहे. ज्याद्वारे इलेक्ट्रॉनिक संप्रेषणाचा कायदेशीर अडथळा राष्ट्रीय सुरक्षेच्या उद्देशाने पुर्ण केला जातो, अशी माहिती यावेळी अश्विनी वैष्णव यांनी दिली.

Parliament Monsoon Session : पहिल्या दिवशी काय झाले?
पेगासस स्पायवेअरद्वारे पत्रकार, कार्यकर्त्यांचे फोन हॅक

-संसदेचे कामकाज दोनवेळा तहकुब

यादरम्यान, संसदेचे कामकाज दोनवेळा तहकूब करावे लागले. संसदेचे कामकाज सुरु होताच, लोकसभेत (Loksabha) कॉंग्रेस (Congress), टीएमसी (TMC), बसपा (BSP) आणि अकाली दलाच्या (Akali Dal) खासदारांनी महागाई, शेतकरी आंदोलन आणि इतर प्रश्नांवर जोरदार घोषणाबाजी केली. या गदारोळामुळे लोकसभा दुपारी दोनपर्यंत तहकूब करण्यात आली. तर राज्यसभा तासाभरासाठी तहकूब करावी लागली.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत भाषण करायला उठताच विरोधी पक्षांनी गदारोळ सुरू केला. कॉंग्रेसचे खासदार महागाईच्या मुद्द्यावरुन तर अकाली व बसपाचे खासदार शेतकऱ्यांच्या मुद्दय़ावर बोलण्यासाठी थेट वेलमध्ये आले. मला वाटले की आज उत्साहाचा दिवस असेल परंतु विरोधी पक्ष दलित, महिला आणि ओबीसी लोकांना मंत्री बनवने हे विरोधकांना पचलेले दिसत नाही. अशी घणाघाती टिका यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.

- संसदेचे कामकाज सुरु होण्यापुर्वी पंजाबच्या शिरोमणी अकाली दलाकडून घोषणाबाजी

पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसच्या वाढत्या किंमतींचा निषेध व्यक्त करण्यासाठी तृणमूल कॉंग्रेसचे खासदार सायकलवरून संसदेत पोहोचले. तर शिरोमणी अकाली दलाने कृषी कायद्याविरोधात संसदेबाहेर निषेध केला. शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल म्हणाले, "देशातील शेतकऱऱ्यांना न्याय हवा आहे. संपूर्ण पक्षाने केंद्र सरकारच्या विरोधात एकवटून उभे राहावे आणि कायदा मागे घेण्यासाठी दबाव आणावा अशी आमची इच्छा आहे."

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com