स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मराठी युवकांनो आपला बी प्लॅन तयार ठेवा..

आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक वर्षे अहोरात्र झटणाऱ्या मराठी युवकांनी या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्या बरोबरच आपला 'बी प्लॅन'ही तयार ठेवावा. या स्पर्धा परीक्षेबरोबरच अनेक क्षेत्रात तुम्ही तुमच कर्तृत्व सिद्ध करू शकता - प्रा.डॉ.विनोद बाबर, प्रेरणादायी वक्ते
प्रा.डॉ.विनोद बाबर, प्रेरणादायी वक्ते
प्रा.डॉ.विनोद बाबर, प्रेरणादायी वक्ते- Saam TV
Published On

प्रा.डॉ.विनोद बाबर, प्रेरणादायी वक्ते

जे स्वप्नी पाहिले, जे आयुष्यात ध्येय समोर ठेवले,  ते रात्रंदिवस प्रयत्न करून पूर्णही केले. पण अधिकारी Officer होवूनही बेरोजगार Unemplyed राहण्याची वेळ आली, म्हणून  पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्निल लोणकर Swapnil Lonkar या २४ वर्षीय तरुणाने  नैराश्यातून  गळफास घेऊन आत्महत्या Suicide केली. स्वप्नील स्पर्धा परीक्षेच्या Competitive Exam स्पर्धेमध्ये यशस्वी ठरला, पण आयुष्याच्या परीक्षेत मात्र त्याला यश मिळवता आले नाही. सुमारे चार ते पाच लाख  विद्यार्थ्यांच्या मधून स्वप्निलला मिळालेले हे यश नक्कीच कौतुकास्पद होतं. पण या स्पर्धेचा चक्रव्यहू त्याला भेदता आल नाही. यशस्वी होवूनही मराठी युवकाला आपल्या आयुष्याचा अशा पद्धतीने शेवट करावा लागला ही फार मोठी शोकांतिका आहे. MPSC aspirants should keep plan B Ready

आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक वर्षे अहोरात्र झटणाऱ्या मराठी युवकांनी  या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्या  बरोबरच आपला 'बी  प्लॅन'ही तयार ठेवावा. या स्पर्धा परीक्षेबरोबरच अनेक क्षेत्रात तुम्ही तुमच कर्तृत्व सिद्ध करू शकता.

हे देखिल पहा

प्रा.डॉ.विनोद बाबर, प्रेरणादायी वक्ते
स्पर्धा परीक्षा एक जुगार ?

आज  महाराष्ट्रातील विविध भागातून लाखो विद्यार्थी आपलं अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून   पुण्यासह मुंबई दिल्ली या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचे तयारी करत आहेत. आमचे युवक आपल्या आई वडिलांच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षांची जाणीव ठेवून आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. लाखो रूपयांचे कोचिंग क्लासेसची फी ,महिन्याचा राहण्याचा व इतर खर्च  आई वडील आपल्या मुलाला काबाडकष्ट करून वेळ पडली तर  कर्ज काढून पुरवत असतात. MPSC aspirants should keep plan B Ready

दरवर्षी सुमारे चार ते पाच लाख विद्यार्थी या परीक्षेला बसतात आणि या परीक्षेत यशस्वी होतात. फक्त शेकडो  विद्यार्थ्यांना यामध्ये यश मिळते. मग 99 टक्के अयशस्वी राहिलेल्या इतर विद्यार्थ्यांनी काय करायचं तर परत पुनश्च: हरि ओम. आम्ही मराठी युवक ठरवत या स्पर्धा परीक्षेच्या मायाजालात आपण आपल्या आयुष्यातील उमेदीतील अनेक वर्ष घालवतो. कारण कधीही यश मिळेल हे माहीत नाही आणि जर एवढे कष्ट करून खर्च करून अपयश आले, तर पुढे काय? कारण यावेळी आयुष्यातील महत्वाची अनेक वर्षे केलेली असतात.आयुष्यातील गेलेली अनेक वर्षे , कर्जाचा डोंगर, आई-वडिलांच्या व इतरांच्या वाढत्या अपेक्षा या सगळ्या तणावातून आमचा युवक नैराश्याच्या खाईत जाऊ शकतो. स्पर्धा परीक्षेच्या व्यतिरिक्तही आपला आयुष्यातील 'बी प्लॅन' हा तयार ठेवायला हवा. MPSC aspirants should keep plan B Ready

या स्पर्धा परीक्षेच्या व्यतिरिक्तही जगात अशा अनेक संधी तुमच्यासाठी उपलब्ध आहेत, की ज्या तुमची वाट पाहत आहेत. कष्ट करण्याची तुमची तयारी आहेच. फक्त आपण दुसरे आणखीन काय करू शकतो, याचाही आपण विचार करायला हवा. एकाच क्षेत्रात अडकून पडू नका, एकाच ठिकाणी जास्त वेळ थांबू नका. जगात अनेक  क्षेत्रही तुमच्यासाठी आहेत. त्यातील आपल्या कौशल्य जाणत्या क्षेत्रात आपली नवीन ओळख निर्माण करा. पण मराठी युवकांनी स्पर्धा परीक्षाचे तयारी नक्की करा. पण त्यासाठी आपण आपल्या  आयुष्यातील किती वर्षे खर्ची घालायची हे ठरवून घ्या. MPSC aspirants should keep plan B Ready

आपण स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालो नाही तर निराश न होता त्यातून लवकर बाहेर पडा. स्पर्धा परीक्षेला दुसरा पर्याय असू द्या! वेगळया क्षेत्राची वाट निवडा ज्यामध्ये तुम्ही पारंगत आहात त्यामध्येच सर्वोत्कृष्ट बनायचा तुम्ही प्रयत्न करा.

युवकांनो तुम्ही  विविध  क्षेत्रात स्वत:चं कर्तृत्व सिद्ध करण्याच्या पात्रतेचा जरूर आहात. गरज आहे ती तुम्ही  स्वत:ला ओळखण्याची. फक्त अधिकारी होऊन समाजसेवा करता येते, आईवडीलांची स्वप्न पूर्ण करता येतात, आयुष्यात यशस्वी होता येते,  या भोळ्या आशेतून बाहे पडा. कारण स्पर्धा परीक्षा तुमचं भवितव्य ठरवू शकत नाही.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com