आपण आंदोलन मागे घेत नाहीत. शिष्टमंडळानं आणखी ४ दिवसांचा वेळ दिला आहे. या दिवसात ते आरक्षणाचा जीआर घेऊन येतील. हे आरक्षण कायमस्वरुपी टिकवायचा आहे. सरकारला सहकार्य करू, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मी समाजाला शब्द दिला आहे, असं सांगून मनोज जरांगे पाटील हे उपोषणावर ठाम आहेत. तुम्ही जे सांगाल ते करतो, पण अध्यादेश काढा, असं जरांगे पाटील म्हणाले. मागील २० मिनिटांपासून जरांगेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या शिष्टमंडळाकडून सुरू आहे.
राज्य सरकारचं शिष्टमंडळ जालना येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेलं आहे. त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. या शिष्टमंडळात गिरीश महाजन, अतुल सावे, संदीपान भुमरे, राजेश टोपे, अर्जुन खोतकर आदी नेते आहेत.
मराठा समाज आरक्षणासाठी जालन्यातील उपोषण सुरू होतं. त्यावेळी उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. या घटनेवरून राज्यात पडसाद उमटत आहेत. शरद पवार यांनी यावरून पुन्हा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. मराठा आरक्षणासाठी उपोषण होत असताना लाठीमार केला. सत्तेचा गैरवापर केला जातोय, असा गंभीर आरोप पवार यांनी केला.
यवतमाळ शहरात सकल कुणबी - मराठासह इतर समाजाकडून जालना येथील लाठीमाराच्या घटनेच्या निषेधार्थ शहर बंदची हाक दिली होती. त्यानंतर नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केला. आंदोलकांनी सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळून रोष व्यक्त केला. गृहमंत्री फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलकांनी लावून धरली. हजारो तरूण रस्त्यावर उतरल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला होता.
जालना येथे मराठा समाज आरक्षणाची मागणी करणाऱ्या उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. याला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करण्यात येत आहे. मराठा क्रांती महामोर्चाच्या वतीने हे आंदोलन सुरू आहे. फडणवीस राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतलाय.
जालन्यात मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांवरील लाठीमाराच्या घटनेचे पडसाद नाशिकमध्येही उमटले. सटाणा शहरात महाविकास आघाडी व मराठा समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. नगरपालिकेसमोरील मुख्य रस्त्यावर सुमारे दोन तास रास्ता रोको करण्यात आला. देवळा-सटाणा, मालेगाव-सटाणा या मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती. दोषींवर कारवाई करावी आणि तातडीने मराठा आरक्षण लागू करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली.
यावेळी त्यांनी जरांगेंना विनंती केली.
लढा सुरू ठेवण्यासाठी तब्येतीकडे लक्ष द्या
लढा एका दिवसाचा नाही
कोर्टाला आणि व्यवस्थेला अंगावर घेतल्याशिवाय प्रश्न मार्गी लागणार नाही
कोणा एका समाजाला आरक्षण देता येणार नाही, हे घटनेत कुठेही म्हटलेलं नाही
इथे शासनाची उदासीनता, त्यामुळेच आरक्षणाचा प्रश्न लोंबकळत राहिलाय
१९ वर्षे लोकसभेत आम्ही राहिलो, आम्ही तिथे आरक्षणाचा प्रश्न मांडला मात्र ज्यांच्याशी संबंधित हा प्रश्न आहे, त्यांनी मात्र उदासीनता दाखवली
जालना येथील घटनेच्या निषेधार्थ आज सलग चौथ्या दिवशी लातूरच्या विविध भागांत बंद पुकारण्यात आला. लातूरच्या निलंगा तालुक्यात आज सकाळपासूनच सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बंद पुकारण्यात आला. यावेळी मराठा समाज बांधवांच्या वतीने रक्तदान करीत सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.
नाशिक : आरक्षणासाठी दोन-तीन समाज आग्रही
जातीचा प्रश्न असल्याने लोक आग्रही
कुणबी असणाऱ्यांना ओबीसी प्रमाणपत्र दिलं जातं
हा प्रश्न का सुटत नाही, मला माहीत नाही
मराठा हे कुणबी आहेत, हे सूर्यप्रकाशाइतकं सत्य आहे.
एक शासन निर्णय काढायला काय हरकत आहे?
ओबीसी मधूनच आरक्षण द्यावे.
विधान परिषद आमदार बाबा दुर्रानी मनोज जरांगे यांच्या भेटीला
जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी बाबा दुर्रानी आंदोलनस्थळी
मराठा आरक्षण मागणीसाठी जालना जिल्ह्यात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील लाठीमाराच्या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूर - राधानगरी राज्यमार्गावर हळदी येथे निषेध करण्यात आला. यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य सरकार आणि केंद्रातील भाजप सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या.
मराठा समाजाच्या वतीने वाई बंदची हाक देण्यात आली. आंदोलकांचा पायी निषेध मोर्चा साताऱ्याकडे निघाला आहे.
आंदोलकांकडून चलो साताराचा जयघोष,
पाचवड फाट्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त, साताऱ्याकडे जाण्यास पोलिसांकडून मज्जाव
वाशिम येथे आंदोलनकर्त्यांनी काढली शिंदे सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा
सकल मराठा समाजासह इतर सामाजिक संघटनांनी दिली होती वाशिम बंदची हाक
छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलकांनी शिंदे सरकारची अंत्ययात्रा काढली
राहुरी शहरात रास्ता रोको, जालन्यातील घटनेचा निषेध
राहुरी बाजार समितीसमोर आंदोलन
रास्ता रोकोत सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी-कार्यकर्ते सहभागी
राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांच्यासह विविध संघटना रास्ता रोकोत सहभागी
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी आंदोलन
जालन्यातील घटनेचा राहुरीत निषेध
आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी
मराठा समाज आरक्षणासह विविध मागण्यांसाठी यवतमाळ बंदची हाक
मराठा कुणबी क्रांती मोर्चा आक्रमक
शहरातील धामणगाव चौफुलीवर टायर जाळून केला रास्ता रोको
जालन्यात पोलिसांनी मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जच्या विरोधात अहमदनगरच्या कोपर्डी गावात आजपासून बेमुदत उपोषण सुरु करण्यात आलं आहे. कोपर्डीतील ग्रामस्थ जालन्यातील या घटनेचा निषेध करण्यासाठी एकत्र जमले आहेत. मराठा क्रांती मोर्चाची ज्या कोपर्डीतून सुरुवात झाली होती, तिथेच हे आंदोलन छेडण्यात आलं आहे.
जालना जिल्ह्यातील सराटी अंतरवाली गावात मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. या लाठीमारात महिला आंदोलकांसह मराठा बांधव गंभीर जखमी झाले. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत असून मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. ठिकठिकाणी बंद पुकारण्यात येत असून या बंदचा फटका वाहतुकीला बसत आहे.
सोमवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये बंद पाळण्यात आल्यानंतर आज कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा बंदची हाक देण्यात आली आहे. सरकारने मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, लाठीहल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याबरोबरच आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली आहे. सकाळपासून या बंदला मोठा प्रतिसाद मिळत असून लालपरीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.