Maharashtra Live Update : संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर

Maharashtra Breaking Live Marathi Headlines Updates 3rd March 2025 : आज सोमवार, दिनांक 3 मार्च 2025 . महाराष्ट्रातील ताज्या घडामोडीचा वेगवान आढावा, दत्ता गाडे पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरण, चॅम्पियन्स ट्रॉफी,धनंजय मुंडे राजीनामा, मुंबई-नाशिक-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking Live Marathi news
Maharashtra Breaking Live Marathi newsSaam tv
Published On

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर

Dnyaneshwari Munde : ज्ञानेश्वरी मुंडेंच उपोषण स्थगित

अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - नरेश म्हस्के

संभाजी महाराज यांना त्रास दिला त्यांची पाठराखण अबू आझमी यांनी केल्यानंतर त्यांच्यावर देश द्रोह गुन्हा दाखल करून त्यांचा विरोधात राज्यपालांकडे देखील तक्रार करणार आहे. अश्या प्रकारे वक्तव्य करून महापुरुषांचा अपमान केला जात आहे.उद्धव ठाकरे हे हिंमत हारले आहेत.हिंदुत्व साठी त्यांना सोनिया गांधी यांची परवानगी घ्यावी लागणार आहे

Raigad : महाडच्या चवदार तळ्यात पडून एका मृत्यू

- चवदार तळ्याच्या दक्षिण बाजु कडील संरक्षण कठड्यावरून एक जण चवदार तळ्यात पडला

- भिकाराम कुरूणकर वय वर्ष 49 रा. करंजखोल असे मृत व्यक्तीचे नाव

- दारुच्या नशेत चवदार तळ्याच्या कठड्याला टेकून उभा असताना तोल जाऊन खाली पडला

- स्थानिक बचाव पथकाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्या कामी यश

Raigad : समुद्रात अडकलेल्या पिकअप टेम्पो तब्बल ५ तासांनी बाहेर काढण्यात यश

श्रीवर्धन येथील हरिहरेश्वर तीर्थक्षेत्र येथे देवांच्या मूर्ती विसर्जन करण्यासाठी आलेल्या पिकअप टेम्पो समुद्रात भरती च्या वेळेला अडकल्याची घटना घडली होती समद्रा आलेले उधाण आणि उसळणाऱ्या लाटांमुळे स्थानिकांचे प्रयत्न असफल ठरले होते मात्र तब्बल ५ तासांनी हा समुद्रात अडकलेला पिकाअप टेम्पो ओहटी लागल्यानंतर मदत पथक आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने रस्सी च्या साह्याने समुद्राबाहेर किनाऱ्यावर खेचून काढण्यात यश आलयं.....

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये धावत्या चारचाकीला आग

छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक परिसरात एका धावत्या चार चाकी वाहनाने अचानक पेट घेतल्याची घटना घडली.वाहनाने पेट घेतल्याचे लक्षात येताच आजूबाजूच्या लोकांनी चालकाला गाडीतून सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे पुढे घडणारा मोठा अनर्थ टळला. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप तरी स्पष्ट झाले नाही. ही घटना ज्यावेळी घडली त्यावेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी रेल्वे स्थानक परिसरात झाली होती.

प्रशांत कोरटकर यांच्या पत्नी पल्लवी कोरटकर सायबर पोलीस स्टेशनमध्ये दाखल

- प्रशांत कोरटकर यांच्या पत्नी पल्लवी कोरटकर सायबर पोलीस स्टेशनमध्ये दाखल.

- यावेळी त्या प्रशांत कोरटकर यांच्या वतीने मोबाईल आणि सिम देण्यासाठी आल्याची शक्यता आहे.

- आज कोल्हापूर कोर्टाने जामीन दिलेल्या नियम अटी शर्तीनुसार त्यांना आज सायंकाळपर्यंत ज्या फोनवरून संभाषण साधल्याचा आरोप आहे तो फोन आणि सिम कार्ड हे नागपूर सायबर पोलिसांना स्वाधीन करायचे होते.

धुळ्यात मधमाशांचा शाळकरी विद्यार्थ्यांवर हल्ला

Summary

या घटनेत २० हून अधिक विद्यार्थी जखमी

मधमाशांच्या तावडीतून सामाजिक कार्यकर्त्यांनी विद्याथ्यांची सुटका करत त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आणि संपूर्ण डोक्यावर मधमाशांचा चावा

शाळेच्या आवारातील निंबाच्या झाडावर आणि शाळेच्या खिडक्यांवर आसलेल्या मधमाशांनी विद्यार्थ्यांवर केला हल्ला

साक्री शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालयातील घटना

मुक्ताईनगर छेडखानी प्रकरणात ५ मार्चपर्यंत संशयीतांना पोलीस कस्टडी

Summary

मुक्ताईनगर छेडखानी प्रकरणात ५ मार्चपर्यंत संशयितांना पोलीस कस्टडी

मुख्य संशयीतांना भुसावळ जिल्हा सत्र न्यायालयात करण्यात आले हजर

पोलिसांनी छेडखानी प्रकरणात चार संशयीतांना अटक केली असून यातील एक संशयित हा अल्पवयीन असल्याने बाल सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे

पालघरमध्ये चालत्या इलेक्ट्रिक बाइकला आग

Summary

पालघरमध्ये चालत्या इलेक्ट्रिक बाइकला आग

पालघरच्या खानपाडा परिसरातील घटना

चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने अनर्थ टळला

सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही; आगीत बाईक जळून खाक

Supriya Sule :  खासदार सुप्रिया सुळे उद्यापासून आमरण उपोषणाला बसणार

बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान असा एक किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी उपोषणाला बसणार आहेत. यासंदर्भात पीएमआरडीए, जिल्हा परिषदकडे पाठपुरावा करून देखील काम होत नसल्याने सुप्रिया सुळे आक्रमक झाल्या आहेत. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बसणार उपोषणाला बसणार आहेत.

लातूर नांदेड महामार्गावरच्या नांदगाव पाटी येथे भीषण अपघात

लातूर नांदेड महामार्गावरच्या अष्टामोड ते नांदगाव पाटी दरम्यान राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झालाय... अहमदपूर वरून लातूर कडे जाणाऱ्या बसचा अपघात झाला आहे... धावत्या बस समोर दुचाकी आल्याने बस पलटी झाली आणि अपघात झाला... तर बस मध्ये तब्बल 42 प्रवासी हे प्रवास करत होते... तर अनेक जण गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे..

लातूर नांदेड महामार्गावरच्या नांदगाव पाटी येथे भीषण अपघात....

लातूर नांदेड महामार्गावरच्या अष्टामोड ते नांदगाव पाटी दरम्यान राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झालाय... अहमदपूर वरून लातूर कडे जाणाऱ्या बसचा अपघात झाला आहे... धावत्या बस समोर दुचाकी आल्याने बस पलटी झाली आणि अपघात झाला... तर बस मध्ये तब्बल 42 प्रवासी हे प्रवास करत होते... या अपघातात दोन ते तीन जणांचा मृत्यू देखील झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे..तर अनेक जण गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे....

Maharashtra Live Update: नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वेळेत बदल

- नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वेळेत बदल

- दुपारऐवजी सकाळच्या सत्रात भरणार शाळा

- उन्हामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वेळेत बदल

- उन्हाळी सुट्यांपर्यंत सकाळच्या सत्रात भरणार शाळा

- सकाळी ७.३० ते दुपारी ११.४५ वाजेपर्यंत भरणार शाळा

- आजपासून निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात

Maharashtra Live Update: रक्षा खडसेंच्या मुलीची छेड, ४ आरोपींना ठोकल्या बेड्या

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह मुलीच्या मैत्रिणींची छेड काढल्या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे

*अनिकेत भोई, किरण माळी आणि अनुज पाटील यांच्यासह एक अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली आहे..

*या प्रकरणात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

*फरार आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिले आहे

*अनिकेत भोई हा या गुन्ह्यातला मुख्य आरोपी आहे.... त्याच्या विरोधात यापूर्वी मारहाणी सह वेगवेगळे असे चार गुन्हे त्याच्या विरोधात दाखल आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे

आरोपींची काही राजकीय पार्श्वभूमी आहे का असे विचारले असता पोलीस अधीक्षकांनी त्यावर बोलणं टाळलं असून बोलण्यास नकार दिला.

dharashiv : शेळ्या चोरणाऱ्या चोरट्यांकडून शेतकऱ्याचा खून,धाराशिव जिल्ह्यातील हिंगळजवाडी येथील धक्कादायक घटना

चोरटे शेळ्या चोरून नेताना शेतकऱ्याच्या लक्षात आले,आरडा ओरड केली असता शेतकऱ्याचा खून; शेळीला मारून झाडावर फेकले

रविवारी मध्यरात्रीची घटना,तानाजी भगवान मुळे असं मृत शेतकऱ्याच नाव

आरोपींना अटक करत कडक कारवाई करावी यासाठी तेर- धाराशिव रोडवर हिंगळजवाडी पाटीवर ग्रामस्थांचा रस्तारोको

धाराशिव मधील ढोकी पोलिसात चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल

गावकऱ्यांनी एक आरोपीला पकडत केलं पोलिसांच्या स्वाधीन,तिघांचा शोध सुरू

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी कोरटकरविरोधात कोल्हापुरात इंडिया आघाडी आक्रमक

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर विरोधात कोल्हापुरात इंडिया आघाडी आक्रमक झालेली आहे.प्रशांत कोरटकरला अंतरिम जामीन मिळाल्यानंतर कोल्हापूरात सर्व विरोधी पक्षासह सामाजिक कार्यकर्त्यांची तातडीची बैठक आज पार पडली. 6 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोल्हापूर दौऱ्यादिवशी आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. पन्हाळा गडावरील कार्यक्रमाच्या पूर्वी गनिमी काव्याने फडणवीस यांची गाडी अडवू आंदोलन करण्याच्या सूचना काही पदाधिकाऱ्यांनी केल्या. फडणवीसांना जर कोल्हापूरात यायचे असेल तर कोरटकर यांना अटक करून इकडे यावे अशी बैठकीत सर्वांनी भूमिका घेतली.

स्वारगेट अत्याचार प्रकरण, आरोपी दत्तात्रय गाडेच्या वकिलांना हवी पोलीस सुरक्षा 

स्वारगेट अत्याचार प्रकरणी आरोपीच्या वकिलांना पोलीस सुरक्षा मिळावी अशी मागणी केलीय. थोड्याच वेळात गाडे याच्या वकिलांची पत्रकार परिषद पार पडणार आहे. पत्रकार परिषदेत वकील स्वारगेट प्रकरणी काय माहिती देणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Vegetables Market: आवक घटल्याने फळभाज्या आणि पालेभाज्यांचे भाव वाढले

वाढत्या तापमानामुळे दैनंदिन बाजारात भाजीपाल्याची आवक घटली असल्याने दर वाढले आहेत. वाढत्या उन्हामुळे भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाल्याचे जाणवत आहे. त्यामुळे भाजीपाल्याची मागणी देखील घटल्याचे चित्र आहे उन्हाळ्याप्रमाणे ऊन असल्याने सरबत आणि रसवंतीगृह गजबजू लागली आहेत. गृहिणींकडूनही लिंबांची खरेदी वाढली आहे. आवकच्या तुलनेत लिंबांना मागणी वाढल्याने आठवडाभरात लिंबाच्या भावात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

धनंजय मुंडे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट

राष्ट्रवादी पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलीय. धनंजय मुंडे आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेणार भेट

मुंबई महानगरपालिकेच्या अ गटाच्या अभियंतेच्या परीक्षेमध्ये घोटाळ्याच्या आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. या परीक्षा घोटाळा प्रकरणावरून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देणार आहेत.ही परीक्षा 25 फेब्रुवारीला घेण्यात आली होती, मात्र या परीक्षेचे पेपर 19 फेब्रुवारीलाच लीक झाले होते. या पेपरची अवैध विक्री करण्यात आल्याचा आरोप मनसेने केला आहे. मनसे विभाग अध्यक्ष मनीष धुरी आणि कुशल धुरी यांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता. या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे. आता या घोटाळ्याच्या प्रकरणावरून राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

महिला दिनी सरकारचं गिफ्ट; फेब्रुवारी आणि मार्चचा मिळणार हप्ता

महिला दिनी महायुती सरकार लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना फेब्रुवारी आणि मार्चचा हफ्ता मिळणार आहे.

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधक आक्रमक

 महाराष्ट्र में दो ही गुंडे कोकाटे-मुंडे' अशा घोषणा विरोधकांकडून करण्यात येत आहेत. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी करण्यात येत आहे. कोकाटे -मुंडेंचा राजीनामा झालाच पाहीजे अशा मागणीवर विरोधक ठाम आहेत.

Dhule Fire:  धुळे शहरातील पाच कंदील परिसरामधील अगरबत्तीच्या दुकानाला आग

धुळे शहरातील पाच कंदील परिसरामध्ये एका अगरबत्तीच्या दुकानाला पहाटे तीन वाजेच्या सुमारास अचानक आग लागली, या आगेची घटना परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी यासंदर्भातील माहिती अग्निशमन विभागाच्या पथकाला दिली, अग्निशमन विभागाचे पथक माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ दाखल झाले व अग्निशमन विभागाच्या जवानांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे, आगीचे कारण शॉक सर्किट मानले जात आहे.

चंद्रपूरमध्ये प्रेमीयुगुलाची वीज टॉवरला गळफास लावून आत्महत्या

प्रेमीयुगुलाने वीज टॉवरला गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना चंद्रपुर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील उचली शिवारात उघडकीस आली. रोहित रमेश लिंगायत (२५) आणि १४ वर्षीय मुलीने आपली जीवनयात्रा संपवली.

अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला 3800 रुपये प्रति क्विंटल भाव

सोयाबीनची आधारभूत किंमत व शासकीय दर हा 4892 प्रतिक्विंटल असताना देखील तो आज खुल्या बाजारात अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 3800 रुपये मिळत असल्याने सोयाबीन उत्पादकांचा प्रतिक्विंटल मागे एक हजार रुपयांचे नुकसान होत आहे. मागील पाच ते सहा वर्षात या दराणे नीचांक गाठला असून सोयाबीन उत्पादक शेतकरी हा हवालदील झाला आहे सोयाबीनच्या शेतीला प्रति एकर 20 ते 22 हजार रुपये खर्च येत असून आमचा लागलेला खर्चही निघत नाही अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे.

Mumbai Transport:  ठाणे ते मुंबई मार्गावर वाहतूक कोंडी

सकाळीपासूनच ठाण्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. मुलुंड येथून ठाण्याच्या दिशेने येत असतानाच मेट्रोचे काम सुरू असतानाच सिग्नल बंद केल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

Pune crime: चाकण जवळील बहुळ गावात चोरट्यांचा पोलिसांवर गोळीबार

चाकण जवळील बहुळ गावात चोरट्यांचा पोलिसांवर गोळीबार केलाय. DCP शिवाजी पवार सह पोलीस कर्मचा-यावर गोळीबार दोघेही जखमी झालेत.पोलिसांकडून प्रति हल्ल्याचा गोळीबार करण्यात आला. यामध्ये गोळीबार करणा-या चोरट्याच्या पायाला गोळी लागली. चोरट्यांच्या हातातल्या पिस्तुल आता पोलिसांवर रोखल्या जाऊ लागल्याने चाकण परिसरात चोरट्यांची दहशत वाढतेय का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.

Dharashiv: धाराशिव शहरात भीषण आग, आगीत पाच दुकानासह जनावरांचा गोठा जळून खाक

आगीत म्हैस आणि वासरू भाजले

शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती

शहरातील ताजमहल टॉकीज ते सिव्हिल हॉस्पिटल रस्तावरील यमाई मंदिराजवळ लागली आग

दुकानामध्ये लॉन्ड्री,बिल्डिंग मटेरियल,घड्याळाच्या दुकानाचा समावेश

पोलीस घटनास्थळी दाखल,पंचनामा करण्याचं काम सुरू

अग्निशामन दलाने नागरिकांच्या मदतीने विजवली आग

Ratnagiri: कोयना जलविद्युत प्रकल्पातून होणारी गळती थांबवण्यासाठी महानिर्मितीचे काम युद्धपातळीवर

जलविद्युत टप्पा 1 व 2 मधील आपत्कालीन झडप बोगदा व वायुवीजन बोगदा येथून होत होती गळती

वीजनिर्मितीतील लिकेजमुळे पाण्याची होत होती नासाडी

नवजा आदान ते विद्युतगृहापर्यत सर्व यंत्रणेची आधुनिक तंत्रज्ञान व यंत्रसामग्री वापरुन केली जात आहे तपासणी

कोयना वीज प्रकल्पाची उभारणी सन 1966 मध्ये पूर्ण झाले असून, अविरतपणे वीजनिर्मिती होत आहे

Protest: ज्ञानेश्वरी मुंडेसह कुटूंब उपोषणासाठी बीडला रवाना

बीडच्या परळीतील मृत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे ह्या आक्रमक झाल्या आहेत.

आजपासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणला बसणार आहेत.

लवकरात लवकर आरोपींना अटक करून न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

21 ऑक्टोबर 2023 रोजी परळी तहसील कार्यालय परिसरात महादेव मुंडे यांची निर्घुण हत्या करण्यात आली होती.

या प्रकरणाला जवळपास दीड वर्ष होत असताना देखील यातील आरोपी अटकेत नाहीत.

हे प्रकरण भाजप आमदार सुरेश धस यांनी पुन्हा समोर आणले. त्या नंतर या प्रकरणाची फाईल री ओपन झाली आहे...

आज सर्व कुटुंब बीड ला आमरण उपोषण करण्यासाठी बीड ला जात आहे..

Pune News: मुळशी धरणाच्या पाण्यासंदर्भात मुंबईमध्ये बैठक

पिण्याच्या पाण्याच्या वाढत्या मागणीबाबत मार्ग निघण्याची अपेक्षा..

मुळशी धरणातून पुणे शहरास मुळशी तालुक्यातील गावांसाठी पाणी मिळावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत आहे.

या पार्श्वभूमीवर या धरणातून पाणी घेण्यातील अडचणी आणि त्यावरील उपाय योजना बाबत चर्चा करून कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक होणार आहे..

जिल्ह्यात पोस्कोनुसार दाखल 6000 खटले प्रलंबित

खटल्यांचा जलद निकाल लावण्यासाठी आवश्यक असलेली न्यायालयीन मनुष्यबळाची कमतरता.

पुरेसा जलद गती न्यायालयाचा अभाव..

गुन्हा दाखल झाल्यापासून निकालापर्यंत लागणारी पायाभूत सुविधांची वानवा, यासह विविध कारणांमुळे बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार दाखल असलेले खटले प्रलंबित राहण्याची संख्या वाढत आहे.

सध्या जिल्ह्यातील विविध न्यायालयात पक्षानुसार दाखल असलेल्या 5712 खटल्यांवर सुनावणी सुरू आहे...

साहित्य महामंडळाचे कार्यालय येणार पुण्यात, 100 व्या संमेलनाच्या आयोजनाचा मान

साहित्य संमेलनाचे आयोजन करणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय आता पुण्याकडे येणार आहे...

घटक संस्थांकडे प्रत्येकी तीन वर्षे फिरत्या स्वरूपात कार्यभार असणाऱ्या महामंडळाचे कार्यालय एक एप्रिलला महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्याकडे हस्तांतरित होणार आहे..

पुढील तीन साहित्य संमेलन या काळात होणार असून यात मानाच्या शंभराव्या साहित्य संमेलनाचा ही समावेश असेल...

नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील दर्ग्यासंदर्भात आज वक्फ बोर्डात सुनावणी

नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील दर्ग्यासंदर्भात आज वक्फ बोर्डात सुनावणी होणार आहे.

सात पीर दर्गा विरुद्ध नाशिक महानगर पालिका यांच्यात सुनावणी छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीनेही हस्तक्षेप याचिका दाखल होण्याची शक्यता आहे. नाशिकच्या जिल्हा न्यायालयात प्रकरण प्रलंबित असतांना वक्फ बोर्डात सुनावणी होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात नाशिक महानगरपालिकेने दर्ग्याच्या परिसरातील अतिक्रमण काढले होते.

Budget Session of State Legislature from Today :आजपासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन

राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. सकाळी 11 वाजता राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरूवात होईल.

शिवशाही बसमधील बलात्कार प्रकरण, दत्ता गाडेचा मोबाईल पोलिसांच्या ताब्यात

पुण्यातील शिवशाही बसमधील बलात्कर प्रकरणी मोठी अपडेट आली आहे. आरोपी दत्ता गाडेचा पोलिसांनी घेतला ताब्यात. पोलिसांकडून आरोपीच्या मोबाईलची तपासणी केली जात आहे.

महादेव मुंडे यांच्या पत्नी आज बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार बेमुदत आमरण उपोषण

ज्ञानेश्वरी मुंडे ह्या परिवारासह आमरण उपोषण करणार आहेत. ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या उपोषणाला मसाजोगच्या गावकऱ्यांचा पाठिंबा आहे. भाजपा आमदार सुरेश धस आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी ज्ञानेश्वरी मुंडे यांची परळी येथील निवासस्थानी भेट घेतली होती.

पुणे शहरात मार्च एंडमुळे अनेक ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांच्या हाल

हवेली क्र. 6चे सह दुय्यम निबंधक अजित फडतरे यांनी तुकडे बंदी. तुकडे जोड कायद्याचा व रेरा कायद्याचा भंग करून दस्त नोंदणी केली असून त्याची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी राज्याचे नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे यांच्याकडे करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com