खडसे परिवार उतरणार एकमेकांविरोधात; जिल्‍हा बँक निवडणूक

खडसे परिवार उतरणार एकमेकांविरोधात; जिल्‍हा बँक निवडणूक
Khadse
Khadse
Published On

जळगाव : जिल्हा बँक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलचा फज्जा उडाला आहे. काँग्रेस या पॅनलमधून बाहेर पडल्‍यानंतर भाजपनेही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपकडून सर्व 21 जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार असल्‍याचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी स्‍पष्‍ट केले आहे. यामुळे भाजपच्या खासदार रक्षा खडसे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यामुळे जिल्‍हा बँक निवडणुकी खडसे परिवारच एकमेकांविरोधात उतरणार हे मात्र नक्‍की. एकंदरीत जिल्हा बँकेची निवडणूक चुरशीची होणार हे मात्र स्‍पष्‍ट झाले आहे. (jalgaon-news-jdcc-bank-election-Khadse-family-will-come-down-against-each-other)

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी भाजप नेते गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला भाजपचे खासदार उन्मेष पाटील, रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे, मंगेश चव्हाण, माजी आमदार स्मिता वाघ, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदकुमार महाजन आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Khadse
नंदुरबार जिल्‍हा परिषदेत उपाध्‍यक्षपद शिवसेनेला; २५ ऑक्‍टोंबरला निवड

नणंद- भावजयी की सासरा– सून लढत?

भाजपने स्‍वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भाजप खासदार रक्षा खडसे या देखील जिल्हा बँक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. भाजपकडून त्यांना उमेदवारी करण्याच्या सूचना असल्याचे त्यांनी माध्‍यमांशी बोलताना सांगितले. रक्षा खडसे यांना भाजपकडून महिला राखीव मतदार संघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे खडसे परिवारातून मुक्‍ताईनगर मतदार संघातून माजी मंत्री एकनाथराव खडसे व जिल्‍हा बँकेच्‍या अध्‍यक्षा अॅड. रोहिणी खडसे यांनी राष्‍ट्रवादीकडून यापुर्वीच अर्ज दाखल केले आहेत. यामुळे खडसे परिवारातच ही लढत हो होण्याची शक्यता आहे. अर्थात माघारीनंतर चित्र स्‍पष्‍ट होईल. ही लढत जिल्ह्यातील प्रमुख लक्षवेधी लढत असणार आहे.

पुढे काय, हे आजच सांगणे अशक्य

जिल्हा बँक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. भाजप सर्व २१ जागांवर अर्ज दाखल करणार आहे. त्यानंतर माघारीसाठी ८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत आहे. या काळात चर्चेचे गुऱ्हाळ सुरू राहील. त्यामुळे पुढे कोणत्या पक्षासोबत युती होईल; किंवा सर्वच पक्ष स्‍वबळावर लढतील? हे आज सांगणे शक्य नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com