सूरज सावंत
मुंबई: राज्यातील महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) मागे तपास यंत्रणांचे ग्रहण हे सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी ईडीकडून (ED) नवाब मलिक (Nawab Malik) यांना अटक झाली. महाविकास आघाडीचा दुसरा मंत्री तुरुंगात गेल्याने एकच खळबळ माजली. मलिकांना अटक होऊन ४८ तास उलटत नाही तोच, आज सकाळी महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) या़च्याघरी आयकर विभागाचे (Income Tax) चे अधिकारी पोहचल्याने चर्चांना उधाण आले.
एका मागोमाग एक महाविकास आघाडीतील नेते तुरूंगात जात असताना, केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा काही केल्या संपत नसल्याचे चित्र दिसते. केंद्रीय तपास यंत्रणेच्या (Central Investigation Agency) रडारवर सध्या महाविकास आघाडीतील अनेक नेते असून उद्या पहाटेच तपास यंत्रणेचे अधिकारी घरी येतील अशी भिती महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांना असल्याचे दिसते.
मुंबई मनपात (Mumbai Municipal Corporation) भ्रष्टाचार (Corruption) झाल्याचे अनेक आरोप गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या (BJP) नेत्यांकडून करण्यात येत होते. अशातच यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शेल कंपन्यांच्या मदतीने भारतातून १५ कोटी रुपये दुबई (Dubai) येथील दोन कंपन्यांमध्ये गुंतवल्याचेसमोर आले आहे.
हे देखील पहा-
तसेच यामिनी जाधव यांनी एका खासगी कंपनींकडून 1 कोटी रुपयांचं कर्ज घेतल्याचा निवडणूक प्रतिज्ञापत्रात उल्लेख आहे, मात्र तपासात ही (शेल) बोगस कंपनी असल्याचं उघड झालं. यामिनी जाधव यांनी कर्ज घेतल्याचं दाखवलेलं आहे पण हा पैसा कर्जाचा नाही तर त्यांचाच असल्याचं आयकर विभागाचं म्हणणं आहे.
तपास यंत्रणेच्या रडारवर सध्या शिवसेनेचे (Shivsena) अनेक बडे नेते आहे यात आमदार प्रताप सरनाईक, खासदार भावना गवळी, खा. संजय राऊत, मंत्री अनिल परब, शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव आडसूळ या प्रमुख नेत्याचा समावेश आहे. त्यामुळे भविष्यात या नेत्याच्या घरीही तपास यंत्रणा सका सकाळीच धडकली तर नवल वाटायला नको.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.