
यशश्री मसूरकर
जरा नीट बस, जोरात हसू नकोस, कपडे नीट कर....मुळातच अपेक्षा ह्या मुलींकडून केल्या जातात. मग त्या वागण्या बोलण्याबाबत असोत किंवा कपड्यांबाबत. साधारणपणे असं दिसून येतं की मुलाने काहीही केलं तरी तो मुलगा म्हणून त्याला ते माफ. प्रत्येक मध्यम वर्गीय घरात कसल्या न कसल्या बाबतीत ही तफावत जाणवलीच आहे. सध्या चर्चेत असलेले 'बाई, बूब्स आणि ब्रा' हे सुद्धा त्यातलच एक उदाहरण.
मुद्दा equality चा आहे. हेच एखाद्या मुलाने उघड्या अंगाने जरी विडिओ टाकला तर काही फरक पडत नाही. आणि त्या विडिओ मुळे कोणाच्या विकृत भावना जाग्या होत नाहीत कारण विकृती ही फक्त मुलींच्या शरीरामुळे जागी होते त्यामुळे अख्ख्या समाजाच्या चारित्र्याची जबाबदारी स्त्री वर्गावर येऊन पडते हे कितपत योग्य आहे ?
एखादी स्त्री स्वतःच घर, करिअर , मानसिक संतुलन आणि सामाजिक भान जपत असतानाच मेटाकुटीला आलेली असते त्यात ही अजून एक जबाबदारी?
स्त्री म्हणजे तिला स्तन असणार हे सगळ्यांना माहित आहे असं असताना तिच्या स्तनांबद्दल एवढी उत्सुकता , विकृती, आणि एवढी झाकपाक कशासाठी ?
स्तनपान जी जगातली सगळ्यात नैसर्गिक गोष्ट आहे ती सुद्धा ह्या विळख्यातून सुटली नाही. एखादा पुरुष रस्त्यावर लघुशंका करताना दिसल्यावर तुम्ही त्याच्याकडे टक लावून पाहत नाही ना? ते जर normalise केलं जाऊ शकतं तर स्तनपान का नाही?
ब्रा चा दिसणारा पट्टा, हलणारे बूब्स हे खूप नॉर्मल आहे. कारण हा अवयव शरीराच्या बाहेर आहे आणि तेही कोणत्याही आधाराशिवाय त्यामुळे त्यांच्या शरीराबरोबर होणाऱ्या हालचाली ह्या सुद्धा नैसर्गिक आहेत. त्याबाबत स्त्री ने संकोच करावा ह्याचं कारण फक्त पुरुषसत्ताक पद्धती असावी.
आजही अशा प्राचीन जमाती आहेत ज्यांत स्त्रिया आपला ऊर्ध्वभाग लपवत नाहीत आणि त्यांच्या आसपास वावरणाऱ्या पुरुषांसाठी ते वावगं ठरत नाही. अनेक मुली घरी ब्रा वापरत नाहीत. त्यांच्या घरी असणाऱ्या पुरुषांची नजर जर वाकडी होत नाही तर हा प्रश्न विकृती जागी करण्याचा नाही तर आपापली विकृती आवरण्याचा आहे. एखाद्या पुरुषा विषयी राग असेल तर समोरचा माणूस बदल्यासाठी जीव घेईल, मारहाण करेल. पण बलात्कार नाही करणार! मग स्त्रियांविषयी राग असेल तर हेच मापदंड न वापरता rape ची भीती का दाखवली जाते?
साधी गोष्ट शिव्यांची. जरी शिव्या पुरुषाला उद्देशून द्यायच्या असतील तर त्यात स्त्री ला का फरपटल जातं? अशा किती शिव्या तुम्हाला माहित आहेत ज्यात स्त्रियांचा उल्लेख नाहीये?
विचार बदलले तर समाज बदलतो पण त्यासाठी प्रत्येक घरातून ह्यासाठी प्रयत्न व्हायला हवे. भविष्यात आपल्या मुलाने एखाद्या स्त्रीचा अनादर करू नये, तिच्या स्त्री असण्यामुळे तिला कमी लेखू नये किंवा तिच्यावर उगाचच बंधनं लादू नये म्हणून प्रयत्न सुद्धा स्त्री लाच करावे लागतील. स्वतःच्या अस्मितेसाठी लहानपणापासून योग्य ते संस्कार प्रत्येक मातेने, शिक्षिकेने करणं गरजेचं आहे. एखादं मुलं अभ्यासात पुढे मागे असलं तरी चालेल पण नीतिमुल्य आणि संस्कार मात्र रक्तात भिनलेले असावेत. पुढच्या पिढीला घडवण्याची , बदलण्याची नैतिक जबाबदारी आपलीच आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.