क्रिकेट पॅव्हॅलियन ते डेक्कन पोलिस स्टेशन... ९९ वर्षांचा प्रवास (पहा व्हिडिओ)

तो ब्रिटिशांचा काळ....साहजिकच क्रिकेटचा प्रसार व्हायला लागलेला....१९०६ साली स्थापन झालेला डेक्कन जिमखाना क्लबही यात मागं राहणं शक्य नव्हतं.....जिमखान्यावर क्रिकेट सुरु झालं आणि वेगवेगळे सामने व्हायला लागले...त्यासाठी आवश्यक होतं एखादं छानसं पॅव्हिलिअन..
भाजेकर पॅव्हेलिअन डेक्कन जिमखाना
भाजेकर पॅव्हेलिअन डेक्कन जिमखाना

अमित गोळवलकर

तो ब्रिटिशांचा British काळ....साहजिकच क्रिकेटचा Cricket प्रसार व्हायला लागलेला....१९०६ साली स्थापन झालेला डेक्कन जिमखाना Deccan Gymkhana क्लबही यात मागं राहणं शक्य नव्हतं.....जिमखान्यावर क्रिकेट सुरु झालं आणि वेगवेगळे सामने व्हायला लागले...त्यासाठी आवश्यक होतं एखादं छानसं पॅव्हिलिअन..

जिमखान्याच्या तेव्हाच्या मैदानाशेजारीच असलेल्या प्लाॅटवर पॅव्हेलिअन Pavilion बांधलं.....इंग्लंडमधल्या क्रिकेट पॅव्हेलियनची शान या पॅव्हेलियनलाही होती.....इमारतीच्या दोन बाजूला पाहुणा संघ आणि यजमान संघाच्या खोल्या, मधल्या भागात स्कोकरर्स बसण्याची व्यवस्था....पॅव्हेलियनमधून पीचवर जाण्यासाठी पायऱ्या असा सगळा थाट होता....या पॅव्हेलियनला नाव दिलं गेलं एल. आर. भाजेकर यांचं...भाजेकर १९०८ ते १९११ या काळात डेक्कन जिमखान्याचे पहिले जनरल सेक्रेटरी होते. ही वास्तू बांधण्यासाठी टिळक तलावाच्या जागी असलेल्या दगडाच्या खाणीतल्या दगडांचा वापर केला गेला. ३० सप्टेंबर, १९२२ रोजी या पॅव्हेलियनचे उद्घाटन झाले.

त्यावेळी जिमखाना परिसर हा शहराच्या बाहेरचा परिसर म्हणून गणला जायचा...इथल्या वसाहतीमध्ये राहणाऱ्या मुला-मुलांसाठी शाळा School हवी या हेतूनं महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीनं डेक्कन जिमखान्याकडं जागा मागितली....जिमखान्याच्या तेव्हाच्या पदाधिकाऱ्यांनी या भाजेकर पॅव्हेलियनची काही जागा शाळेसाठी दिली.. २२ आॅक्टोबर, १९२२ पासून या वास्तूत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या महाराष्ट्र प्राथमिक शाळेचे वर्ग भरायला सुरु झालं.

त्यावेळी सुरुवातीला चार वर्ग सुरु करण्यात आले...पुढे शाळा आपल्या स्वतःच्या वास्तूत गेली आणि भाजेकर पॅव्हेलियन पुन्हा मोकळं झालं....दरम्यानच्या काळात दुसरं महायुद्ध सुरु झालं आणि ब्रिटिशांनी या जागेत रेशनिंगचं आॅफिस सुरु केलं.....नंतरच्या काही वर्षांत या वास्तूत आयुर्वेद रसशाळेचा औषधांचा कारखानाही काही काळ चालला.....

जिमखान्यावरची वस्ती वाढायला लागली तशी या भागात पोलिस चौकी असावी ही गरज निर्माण झाली.....सुरुवातीच्या काळात डेक्कन पोलिस ठाणं Deccan Police Station सध्याच्या गरवारे पुलाच्या Garware Bridge शेजारी असलेल्या बंगल्यात होतं असं जुने लोक सांगतात...पुढे या भागाचा विस्तार वाढला आणि पोलिसांना ही जागा कमी पडायला लागली....त्यावेळी जागेच्या शोधात असलेल्या पोलिसांनी निवड केली ती याच भाजेकर पॅव्हेलियनची. सुमारे १९५५ च्या दरम्यान या वास्तूतून पोलिस ठाण्याचा कारभार सुरु झाला. तेव्हापासून आजपर्यंत या वास्तूत डेक्कन पोलिस ठाणे आहे.एकेकाळी अव्वल दर्जाचे खेळाडू पाहिलेल्या या वास्तूनं नंतरच्या काळात खतरनाक गुन्हेगारही पाहिले.....

पूर्वी या वास्तूला सीमाभिंत नव्हती...१९६० ते १९६२ च्या दरम्यान या ठिकाणी जिमखान्याने सीमाभिंत बांधून दिली. पुण्याचे पोलिस आयुक्तालय व्हायचं होतं. तत्कालिन पोलिस अधिक्षक तनखीवाले यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी लाॅकअप बांधून देण्याची मागणी केली. डेक्कन जिमखान्याने १५ मार्च १९६४ रोजी सर्वसाधारण सभेत हे लाॅकअप बांधून देण्याचा ठराव संमत केला आणि २५ हजार रुपये खर्चून इथलं लाॅकअप बांधून दिलं. त्या पूर्वी या ठिकाणी काही पोलिस कर्मचारी रहात होते. हेडकाँन्स्टेबल दळवी हे या वास्तूत निवासास असलेले शेवटचे पोलिस कर्मचारी होते असं डेक्कन जिमखान्याकडील रेकाॅर्डवरुन दिसतं.

१९६१ साली पुण्यात पानशेत धरण फुटलं त्यावेळी या वास्तूच्या छपरापर्यंत पाणी पोहोचलं होतं....आजही इथल्या वरिष्ठ पोलिस निरिक्षकांच्या खोलीबाहेर ही पूररेषा आखलेली आहे....त्यावेळी पोलिस ठाण्याची स्टेशन डायरी वाचवण्यासाठी तेव्हाचे ठाणे अंमलदार ती घेऊन छपरावर चढून बसले होते असं सांगितलं जातं. एकूणच ही जागा वैशिष्ट्यपूर्ण आहे हे नक्की.....आजही या पॅव्हेलियनची मालकी डेक्कन जिमखाना क्लबकडे आहे.....मध्यंतरीच्या काळात या वास्तूचं नूतनीकरण करण्यात आलं. पण मूळ ढाचा तसाच आहे. शंभराव्या वर्षात पदार्पण करतानाही या इमारतीचा एकही चिरा ढळलेला नाही.

Edited By - Amit Golwalkar

भाजेकर पॅव्हेलिअन डेक्कन जिमखाना
दिल्लीत 1 जानेवारी 2022 पर्यंत सर्व प्रकारच्या फटाक्यांवर बंदी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com