हवामान बदलाचा मराठवाड्याला मोठा धोका; भविष्यात भीषण दुष्काळ आणि पुराचं संकट...

हवामान बदलाचे परिणाम जगभर जाणवत असताना मराठवाड्याला भीषण दुष्काळाचे संकट आणि औरंगाबादला दुष्काळासह पुराचाही धोका तर हिंगोली अत्यंत असुरक्षित असल्याचे समोर आलंय.
हवामान बदलाचा मराठवाड्याला मोठा धोका; भविष्यात भीषण दुष्काळ आणि पुराचं संकट...
हवामान बदलाचा मराठवाड्याला मोठा धोका; भविष्यात भीषण दुष्काळ आणि पुराचं संकट...डॉ. माधव सावरगावे
Published On

औरंगाबाद: हवामान बदलाचे परिणाम जगभर जाणवत असताना मराठवाड्याला भविष्यात मोठ्या संकटाचा सामना करावा लागण्याची वेळ येणार असल्याचं हवामान बदलाच्या एका अभ्यासात समोर आलंय. मराठवाड्याला भीषण दुष्काळाचे चटके बसतील आणि औरंगाबादला दुष्काळासह पुराचाही धोका तर हिंगोली अत्यंत असुरक्षित असल्याचे समोर आलंय. (Climate change poses major threat to Marathwada; Extreme droughts and floods in the future)

हे देखील पहा -

हवामान बदलामुळे निर्माण होत असलेल्या प्रश्नांमुळे जग चिंतेत असताना महाराष्ट्रालाही भविष्यात हवामान बदलामुळे मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. त्यातच मराठवाड्याला दुष्काळ, पुराचा धोका असल्यानं संपूर्ण मराठवाडा हवामान बदलाच्या धोक्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. २०२० मध्ये भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने हवामान बदलांचा राज्यांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला होता. मंत्रालयाने या परिणामांचा जिल्हा स्तरावर अभ्यास करण्याची गरज वर्तवली होती. त्यानुसार दिल्लीच्या "काऊन्सिल ऑन एनर्जी, एन्वायरोनमेंट अॅण्ड वॉटर' (सीईईडब्ल्यु) या संस्थेने पहिल्यांदाच २७ राज्यांतील ६४० जिल्ह्यांतील हवामान बदलांचे परिणाम अभ्यासले आणि नुकताच या जिल्ह्यांचा "क्लायमेट व्हल्नरेबिलीटी इंडेक्स' जाहीर केला.

इंटरगर्व्हनमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज म्हणजेच आयपीसीसीच्या निकषांप्रमाणे सीईईडब्ल्युने हा अभ्यास केला. यात हवामान बदलाचे परिणाम म्हणून महाराष्ट्रातील ३६ पैकी ३० जिल्ह्यांवर पूर, चक्रीवादळ आणि दुष्काळाचे संकट असल्याचे निष्कर्ष निघाले.

या तीन संकटाच्या तीव्रतेनुसार शहरांचे पुढील प्रमाणे वर्गीकरण करण्यात आले:

मराठवाड्यातील हिंगोली अत्यंत असुरक्षित,

असुरक्षितमध्ये उस्मानाबाद, नांदेड, बीड, औरंगाबाद, परभणी तर

मध्यम असुरक्षितमध्ये जालना, लातूर जिल्हे आहेत.

औरंगाबादला दुहेरी धोका:

हिंगोली, उस्मानाबाद, नांदेड, बीड, लातूर, परभणी, जालना या जिल्ह्यांना दुष्काळाचा धोका वर्तवण्यात आला आहे.

हे संकट १०० अंकांपैकी मोजायचे झाल्यास:

हिंगोली: ६१.२, उस्मानाबाद: ५९.३, परभणी: ५६.१, नांदेड: ५०.१, बीड: ४९.६, लातूर: ३९.५ तर जालन्यावर ३१.८ एवढे संकट आहे. औरंगाबादला दुष्काळ आणि पूराचा धोका असून याचे प्रमाण ४८.५ आहे.

इतकंच नाही तर पुराचा सर्वाधिक धोका असणाऱ्या देशातील टॉप २० शहरात राज्यातील मुंबई (८४.२) वगळता एकाही शहराचा समावेश नाही. दुष्काळाचे संकट असणाऱ्या देशातील टॉप २० शहरात राज्यातील नागपूर (९०), जळगाव (७०) या दोन शहरांसह मराठवाड्यातील औरंगाबाद (९०) आणि उस्मानाबाद (८०) यांचा समावेश आहे. चक्रीवादळाचा धोका असणाऱ्या देशातील टॉप २० शहरात राज्यातील एकही नाही.

हवामान बदलाचा मराठवाड्याला मोठा धोका; भविष्यात भीषण दुष्काळ आणि पुराचं संकट...
बायकोचा वाढदिवस विसराल तर तुरुंगात जाल! 'या' देशातील अजब कायदा

३१ ऑक्टोबरपासून संयुक्त राष्ट्राची २६ वी हवामान बदल परिषद म्हणजेच सीओपी-२६ स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे सुरू झाली. यात हरितवायु उत्सर्जन, जागतिक तापमान वाढ, हवामान बदल आणि त्यामुळे निर्माण झालेल्या संकटावर मंथन सुरू आहे. त्यापूर्वीच समोर आलेला सीईईडब्ल्युचा अहवाल डोळ्यात अंजन घालणारा आहे. त्यामुळे जगभरात धोके वाढत असताना नेहमी दुष्काळ आणि आपत्तीमुळे संकटात सापडणाऱ्या मराठवाड्यासाठी भविष्य धोक्याची घंटा वाजवत आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com